मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून नव्या जोमाच्या अभिनेत्यांना टक्कर देणारं एक नाव म्हणजे अभिनेता सलमान खान याचं. सलमान फक्त त्याच्या चित्रपटांमुळंच चर्चेत आहे असा जरस तुमचा समज असेल, तर तसं नाहीय. कारण इतरही अनेक कारणं आहेत ज्यामुळं या यारों का यार सतत चर्चेत आमि प्रकाशझोतात असतो. (Salman khan)
रुपेरी पडद्यावर जितके रंग दिसतात तितकेच रंग सलमानच्या खासगी आयुष्यातही पाहायला मिळाले आहेत.
विविध अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं जाणं असो किंवा मग एखाद्या अभिनेत्रीसाठी त्यानं केलेली मेहनत असो. सलमानचं नाव आलं की चर्चा तर होणारच, असंच एक समीकरण.
कलाजगतामध्ये सलमाननं जिकते खास मित्र जोडले तितक्याच खास मैत्रिणीही जोडल्या. अशीच एक मैत्रीण म्हणजे लारा दत्ता.
म्हणे सलमानसाठी ती इतकी खास आहे, की तो तिला अगदी मध्यरात्रीही फोन करतो.
सहसा कोणा विवाहित महिलेला असं रात्री अपरात्री फोन वगैरे करणं चुकीचंच. पण, सलमान चुकतोय का असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तसं खरंच नाही.
कारण, सलमानसाठी लारा अगदी खास आहे. खुद्द लारानंच एका मुलाखतीमध्ये याबाबतचा उलगडा केला होता.
'सलमान रोज रात्री 12 वाजता उठतो आमि मला फोन करतो. बरं, मीसुद्धा रात्री त्याचा फोन उचलते', असं ती म्हणाली होती.
लारा आणि सलमानच्या मैत्रीचा हा किस्सा आहे की नाही खास ?