बॉलिवूडमध्ये 'ही' कमाल करणारा सलमान खान ठरला एकमेव स्टार

सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची रसिकांची इच्छा अखेर 'टायगर जिंदा है' या चित्रपटाने पूर्ण केली आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 25, 2017, 04:37 PM IST
बॉलिवूडमध्ये 'ही' कमाल करणारा सलमान खान ठरला एकमेव स्टार  title=

मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची रसिकांची इच्छा अखेर 'टायगर जिंदा है' या चित्रपटाने पूर्ण केली आहे.

२२ डिसेंबरला रिलीज झालेला 'टायगर जिंदा है'  हा चित्रपट  'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 

तीन दिवसात कोटीच्या क्लबमध्ये 

' टायगर जिंदा है' च्या ट्रेलर प्रमाणेच तिन्ही गाण्यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. युट्युबवर ट्रेलर आणि गाण्यांच्या व्हिडिओंनी लोकप्रियतेचे नवे विक्रम रचले होते. त्यानंतर हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्कीच होते.  

अपेक्षेप्रमाणे ' टायगर जिंदा है' या चित्रपटाला रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला पार केला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला ३४.१० करोड इतके ओपनिंग मिळाले आहे. सध्या ११४.९३ करोड हून अधिक कमाई करत आहे.  

सलमान हा एकटाच असा कलाकार  

सलमानच्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पल्ला पार केल्यानंतर आता स्वतः त्याने नवा विक्रम रचला आहे.  त्यानुसार  आता  केवळ सलामान खान हा असा एकमेव  अभिनेता आहे ज्याचे सर्वाधिक चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.  सलमानखानच्या ११ चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.  

सलमान खानचे कोणते चित्रपट १०० कोटींच्या पुढे गेले ?  

ट्युबलाईट - ११४.५७ कोटी 
सुलतान चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला होता.
बजरंगी भाईजान चित्रपटाने ३२०.६५ कोटींच्या पलिकडे गेला होता. 
प्रेम रतन धन पायो -  २०७ कोटी
जय हो -  १०९.३५ कोटी 
दबंग  २-  १५४ कोटी 
किक -  २३३ कोटी 
एक था टायगर -  १९८ कोटी 
बॉडीगार्ड -  १४८ कोटी 
रेडी - १२० कोटी 
दबंग -  १३८. ८८ कोटी