गंभीर आजारामुळे त्रस्त सलमान संपवणार होता स्वतःचा जीव, पण...

सलमान खान गंभीर आजारामुळे स्वतःचं आयुष्य संपवायला निघाला, चाहते हादरले  

Updated: Feb 25, 2022, 04:27 PM IST
गंभीर आजारामुळे त्रस्त सलमान संपवणार होता स्वतःचा जीव, पण... title=

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी सिनेमा तर कधी सलमानची फिटनेस इत्यादी गोष्टींमुळे भाईजान चर्चेत असतो. सलमान किती फिट आहे, हे देखील सर्वांना माहिती आहे. फार कमी लोकांना माहिती आहे सलमान एका गंभीर आजाराने त्रस्त होता. त्या आजावावर उपचार घेण्यासाठी त्याला वांरवार परदेशात जावं लागत होतं. खुद्द सलमानने या आजाराबद्दल सांगितलं आहे. 

सलमानला ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया नावाचा आजार झाला. ज्यावर त्याने अनेक दिवस उपचार देखील घेतले. जवळपास 9 ते 10 वर्ष आजारामुळे सलमान त्रस्त होता. 

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया आजारासाठी तो अमेरिकेत जायचा. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया एक असा आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीचं डोकं आणि शरीराच्या इतर भागांना वेदना होतात. 

आजाराबद्दल काय म्हणाला सलमान? 
2017 साली प्रदर्शित झालेल्या 'ट्युबलाईट' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान म्हणाला, 'ट्राइजेमिनल न्यूरेल्जिया' आजाराला  सुसायडल डजीज देखील म्हटलं जातं. यामुळे माझ्या मनाक आत्महत्या करण्याचा वितार आला...'

सलमानचे आगामी सिनेमे 
सलमान लवकरचं  'कभी ईद कभी दीवाली', 'किक 2', 'लाल सिंह चड्ढा',  'पठान' आणि 'टायगर 3' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.