Salman Khan यापुढे BIGG BOSS शो होस्ट करणार नाही?

बिग बॉस आणि सलमान खानचे चाहते वीकेंड का वार एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Updated: Oct 24, 2021, 03:22 PM IST
Salman Khan यापुढे BIGG BOSS शो होस्ट करणार नाही?

मुंबई :  बिग बॉस आणि सलमान खानचे चाहते वीकेंड का वार एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. सेलेब्स दर आठवड्याला पाहुणे म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि सलमान खानसोबत खूप मजा करताना दिसतात. यावेळी हिना खान आणि मनीष पॉल शोमध्ये पाहुणे म्हणून आले आणि दोघांनाही स्पर्धकांचं केवळ मनोरंजक करायलाच मिळालं नाही तर सलमान खानसोबत खूप मजामस्ती ही करता आली. 

सलमानने मनीष पॉलच्या मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली

मनीष पॉलने शोमध्ये हजेरी लावली आणि सलमान खानला अनेक विचित्र प्रश्न विचारले. जर सलमान खानने या प्रश्नांची कोणतीही उत्तरे दिली तर त्याला मनीष पॉलसह त्याच्या कोणत्याही गाण्यावर हुक स्टेप्स करावे लागतील.

मनीषच्या प्रश्नांना सलमान खान अतिशय हुशारीने उत्तर देताना दिसला. मनीष पॉलने सर्वप्रथम सलमानला विचारले की, तो वडिलांना घाबरतो का? त्याला उत्तर देताना सलमान म्हणाला की, तो घाबरत नाही पण वडिलांचा आदर करतो.

सलमान खान बिग बॉस 16 होस्ट करणार का?

यानंतर मनीषने सलमानला विचारले की, तूम्ही कोणत्या अभिनेत्रीची खोटी प्रशंसा केली आहेस? या प्रश्नाला उत्तर देताना सलमान खान हसला आणि म्हणाला- होय नेहमी. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर मनीष पॉल सलमान खानला विचारतो की सलमान खान बिग बॉस 16 होस्ट करण्यास नकार देईल का? यावर सलमानला हो किंवा नाही असे उत्तर द्यावे लागले. मात्र, या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी सलमान काही मिनिटे घेतो आणि नंतर विचार करतो आणि म्हणतो- नाही हो आणि नाही नाही. यानंतर दोघेही खूप हसले.