Salman Khan च्या हातातील खास ब्रेसलेट हरवलं अन्....!

Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) कुठेही गेला तरीही एक गोष्ट नेहमीच त्याच्यासोबत दिसते ती म्हणजे त्याच्या हातातील ब्रेसलेट. जसं त्याची प्रत्येक स्टाईल ही सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी असते. तसेच त्याचं ब्रेसलेट हे तो प्रत्येक लूक सोबत मॅच करताना दिसतो. तो आणि त्याचं हे ब्रेसलेट (bracelet) गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत आहे. 

Updated: Feb 2, 2023, 11:06 AM IST
Salman Khan च्या हातातील खास ब्रेसलेट हरवलं अन्....!  title=
What bracelet does Salman Khan wear?

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan)  सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खानला (Salman Khan) 'भाईजान' असं म्हटलं जातं. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळीच्या अडीअडचणीला सलमान खान धावून जात असतो. तसेच  सलमान खान याच्याकडे प्रसिद्ध, पैसा सर्वकाही आहे, पण तरी देखील अभिनेता एकटं आयुष्य जगत आहे. जरी सलमान खान एकटं आयुष्य जगत असला तरी त्यासोबत नेहमीच एक गोष्ट असते ती म्हणजे हातात असलेलं ब्रेसलेट...

चित्रपटात अभिनयाचं काम करत असो किंवा आणखी काय सलमान त्याचं हे ब्रेसलेट कधीच हातातून काढत नाही. सलमान एका मुलाखतीत या ब्रेसलेटबाबत बोलला होता. तसेच हे ब्रेसलेट त्याच्यासाठी का एवढं खास आहे हे सांगितलं होतं. तो म्हणाला होता, माझे वडिल अशाप्रकारचे ब्रेसलेट वापरत होते. त्यावेळी मी त्यांच्या ब्रेसलेटसोबत खेळत असायचो. जेव्हा मी मोठा झालो, काम करायला सुरूवात केली, तेव्हा त्यांना तसंच एक ब्रेसलेट मला त्यांनी दिले. यामध्ये असलेल्या खड्याला फिरोज असं म्हटले जाते. 

वाचा: विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...  

या ब्रेसलेटबाबत सांगतांना सलमान खान म्हणाला की, हा एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ दगड आहे. जेव्हा तुमच्याकडे कोणत्याही नकारात्मक शक्ती येते तेव्हा हा दुर्मिळ दगड त्या स्वत:कडे खेचून  घेतो. त्याच्या वाकड्या रेषा तयार होतात आणि मग त्याला तडा जातो. सध्या माझ्या हातात असलेला हा सातवा खडा आहे. 

या ब्रेसलेटवरून सलमान खानने एक किस्सा देखील शेअर केला. काही वर्षापूर्वी सलमान खान त्याच्या मित्रांसोब पनवेल फार्महाऊसवर पार्टी करत होता. त्यावेळी मस्ती-धमाल करता करता ते ब्रेसलेट कुठेतरी हरवसं आणि सलमानचा मूड खराब झाला. त्यानंतर त्याने मित्रांसोबत ते ब्रेसलेट शोधायला सुरूवात केली. त्यानंतर अश्मित पटेलला ते स्विमिंग पूलमध्ये पडलेलं सापडलं. अखेर ब्रेसलेट सापडल्यानंतर सलमानच्या चेहऱ्यावर हसू आले.