मुंबई : बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान गुरुवारी काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. सलमानला जोधपूर कोर्टाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनावली. कोर्टाने सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत कुमार यांची निर्दोष सुटका केली. यादरम्यान सलमान बाबतच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला माहीती आहे. दरम्यान सलमानची कमाई आणि त्याच्याकडे किती संपत्ती याबाबत प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते.
गेल्या अनेक दिवसांपासून बातमी येत होती की बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सर्वाधिक फी घेणारा अॅक्टर आहे. बिग स्क्रीनसह छोट्या पडद्यावरही सर्वाधिक कमाई करणारा तो अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान बिग बॉस ११चा एक शो होस्ट करण्यासाठी ११ कोटी रुपये घेत असे.
प्रसिद्ध मॅगॅझिन फोर्ब्सने डिसेंबर २०१७मध्ये टॉप १०० सेलिब्रेटी लिस्ट जाहीर केली होती. यात सेलिब्रेटींच्या कमाईबाबत माहिती देण्यात आली होती. या लिस्टमध्ये सलमान अव्वल स्थानी होता. फोर्ब्सनुसार सलमानने १ ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत अनेक जाहिराती, सिनेमे, टीव्ही शोद्वारे ३७ मिलियन डॉलर(तब्बल २३२.८३ कोटी रुपये) कमावले होते.
इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींच्या यादीत सलमान ९व्या स्थानावर होता. सलमान खानची पूर्ण वर्षाची कमाई २३२.८३ कोटी रुपये होती. याचाच अर्थ तो दिवसाला ६३.७ लाख रुपये कमावतो. ही यादी ट्यूबलाईट हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आली होती.