अन्‌ सलमानने छेडले सूर... 'मै तारे.....'

नवीन रोमँटिक गाण्याचा टिझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला.

Updated: Mar 16, 2019, 02:38 PM IST
अन्‌ सलमानने छेडले सूर... 'मै तारे.....' title=

दिल फिर भी चूप कैसे...'नोटबुक' सिनेमातील नवीन गण्याचं टिझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं खुद्द अभिनेता सलमान खानने गायलं आहे. नुकताच सिनेमातील तीन गाणे प्रदर्शित झाले आहेत. 'नई लगदा', 'बूमरो' आणि 'लैला' हे गाणे प्रदर्शित केले. नवीन रोमँटिक गाण्याचा टिझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला. सिनेमातील हे गाणं सलमान खानच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं असून विषाल मिश्रांनी संगीत दिले आहे.

 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय वीर जवानांनी आपल्या प्रणाची आहुती दिली. याच निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्य़ात आले होते. 'नोटबुक' सिनेमातील एक गाणं पाकिस्तानी गायक अतिफ असलमच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात येणार होते.   

सिनेमात प्रनूतन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात झहीर इक्बाल सुद्धा डेब्यू करणार आहे. सलमान खानच्या प्रोडक्शनखाली तयार होत असणारा 'नोटबुक' सिनेमा २९ मार्च रोजी सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे.