सलमान खानशी इतकी जवळीक साधणारी ही तरुणी कोण? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

Updated: Oct 18, 2021, 05:20 PM IST
 सलमान खानशी इतकी जवळीक साधणारी ही तरुणी कोण? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

मुंबई : चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सलमान खानचे जगभरात करोडो चाहते आहेत. जे त्याच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. सलमानशी संबंधित कोणतीही पोस्ट असली तरी ती सोशल मीडियावर व्हायरल व्हायलाच हवी. या अनुक्रमात, सलमान खानचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो एअरफोर्सच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या फोटोत त्याच्यासोबत एक मुलगी आहे. हा पाहिल्यानंतर चाहते गोंधळून जात आहेत की, ही मुलगी नेमकी आहे तरू कोण!

हा फोटो बॉलिवूड पापाराजी व्हायरल भयानीच्या अधिकृत इन्स्टा पेजवरून शेअर केला गेला आहे. फोटोमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, एक मुलगी सलमान खानच्या जवळ त्याला पकडून स्माईल देत आहे. या फोटोत सलमानही खूप आनंदी दिसत आहे. या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रिया दिसत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर या सुंदर मुलीचे नाव जाणून घेण्यासाठी चाहते हतबल होत असल्याचं दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोवर कमेंट करताना एका युजर्सने लिहिलं आहे की, 'हा फोटो 2013 मधील एक जुना फोटो आहे', तर दुसऱ्या युजर्सने कमेंट करत लिहीलं आहे की, 'आमच्या कॅटरिनासोबत इतका आनंदी कधीच दिसला नाहीस'. त्याचबरोबर काही लोक या फोटोला बनावटही म्हणत आहेत. सलमान खानबद्दल बोलायचं झालं तर, आजकाल तो बिग बॉस 15 होस्ट करताना दिसत आहे. अभिनेता राधेमध्ये शेवटचा दिसला होता, तर टायगर 3 हा त्याचा आगामी चित्रपट आहे.