सलमानकडून चाहत्यांसाठी गुडन्यूज, रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य

सलमान खानचं रिलेशनशिप स्टेटस जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. 

Updated: Sep 24, 2021, 04:02 PM IST
सलमानकडून चाहत्यांसाठी गुडन्यूज, रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य

मुंबई : सलमान खानचं रिलेशनशिप स्टेटस जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव देखील जोडलं गेलं आहे. त्याचे चाहते अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न देखील विचारतात. पण अनेकवेळा असं दिसून आलं आहे की, तो स्वतः त्याच्या लव्हलाईफची खिल्ली उडवतो. बॉलिवूडच्या भाईजानने अलीकडेच त्याचं सगळ्यात मोठं रिलेशनशिप मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्याने हे देखील सांगितलं की, आजही त्यांच्यातील समानता म्हणजे या दोघांनी अद्यापही लग्न केलं नाही.

सलमान खानच्या प्रत्येक लव्हस्टोरी प्रसिद्ध आहेत, मात्र अभिनेत्याने आता उघड केलेल्या नात्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. सलमान लवकरच टीव्हीचा सगळ्यात लोकप्रिय शो 'बिग बॉस 15' होस्ट करताना दिसणार आहे. अलीकडेच, मध्य प्रदेशात शो संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये भाईजान देखील सहभागी झाला होता. ईथे त्याने त्याच्या सगळ्यात दिर्घकाळ चालणाऱ्या नात्याचा खुलासा केला.

सलमान खानने सांगितलं की, बिग बॉस हे एकमेव असं नातं आहे जे माझं सगळ्यात जास्त काळ टिकलं आहे. नाहीतर माझं प्रत्येक नातं मला सोडून जातं किंवा ते नातं मी सोडून देतो. मात्र बिग बॉस हे एकमेव नातं आहे जे माझ्या आयुष्यात कायम आहे. स्वत: आणि बिग बॉसमधील समानतेचं वर्णन करताना सलमान म्हणाला की, बिग बॉस आणि माझ्यातील साम्य म्हणजे आम्ही दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. म्हणूनच आपण कोणत्याही भीतीशिवाय स्वतःला बॉस समजतो.

सलमान खान म्हणाला, बिग बॉससोबतचं माझं नातं कदाचित एकमेव आहे जे इतके दिवस टिकलं आहे. काही नातेसंबंध, मी आता काय सांगू, ते असू द्या. पण बिग बॉस माझ्या आयुष्यात खूप काळापासून टिकून आहे. बिग बॉस 15 च्या पत्रकार परिषदेत दोन स्पर्धकांची नावं उघड झाली. त्यापैकी एक असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आहे आणि दुसरी अभिनेत्री डोनल बिश्त देखील या शोचा भाग असेल. दोघंही व्हिडीओ कॉलद्वारे या पत्रकार बैठकीला उपस्थित राहिले होते.

यावेळी बिग बॉस 15 ची थीमही खूप खास आहे. सलमान खानच्या या शोची थीम जंगलावर आधारित आहे. असंही वृत्त आहेत की, यावेळी हा शो 5 महिने चालू शकतो. पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खान म्हणाला, 'जंगल मे मंगल किंवा जंगलात दंगल. मला हसणारे चेहरे, थोडा रोमान्स आणि खेळ कसे खेळतायेत हे पाहायचं आहे. मला काही लोकांना स्वतःसाठी आणि काही त्यांच्या प्रियजनांसाठी लढताना पाहायचं आहे.