जेव्हा सलमान खान 'लव ऑफ लाइफ' सोबत परदेशात फिरतो...

अभिनेता काही दिवसांपूर्वीच माल्टामध्ये 'भारत'च्या शूटिंगसाठी पोहचला आहे. 

Updated: Aug 13, 2018, 02:32 PM IST
जेव्हा सलमान खान 'लव ऑफ लाइफ' सोबत परदेशात फिरतो... title=

मुंबई : अभिनेता काही दिवसांपूर्वीच माल्टामध्ये 'भारत'च्या शूटिंगसाठी पोहचला आहे. बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग अजूनही फारसे माल्टामध्ये झालेले नसले तरीही 'गेम ओफ़ थ्रोन्स'सारख्या सीरीज माल्टात शूट झाल्या आहेत.  बॉलिवूडप्रेमींची वर्दळ कमी असल्याने सलमान खान माल्टामध्ये फिरत आहे. नुकतेच सलमान खान आणि त्याची आई माल्टाच्या मॉलमध्ये फिरत असल्याचे काही व्हिडिओ, फोटोज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. 

 

 

Exploring #malta ..

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानची खास पोस्ट 

अभिनेता सलमान खानने देखील माल्टामधील त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचं कॅप्शन फारच खास आहे. 'विथ माय लव्ह ऑफ लाईफ' असं कॅप्शन देऊन सलमानने हा फोटो सोशलमीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. 

 

 

With the love of my life .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

भारतचं सेकंड शेड्युल  

भारत सिनेमातून प्रियांका चोप्राची एक्झिट झाल्यानंतर आता कॅटरीना कैफची वर्णी लागली आहे. कॅटरिनासोबत दिशा पटनी, नोरा फतेहीदेखील झळकणार आहे. 'भारत' हा कोरियन सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2019च्या ईदला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.