बॉलिवूड आणि चाहत्यांसाठी सलमान खान अन् त्याच लग्न हा विषय काही नवीन नाही. आजही त्याची लग्नाची चर्चा होत असते. त्याच नाव इंडस्ट्रीत बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. ऐश्वर्या राय आणि सलमानचं अफेअर आणि त्यानंतर कतरीनासोबतच अफेअर हे जगजाहीर आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या दोन्ही अभिनेत्रीपूर्वी सलमान खानचं एका अभिनेत्रीशी लग्न जुळलं होतं. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. पण ते लग्न अभिनेत्रीने मोडलं. याबद्दल खुद्द सलमान खानने कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये सांगितलं होतं. या चॅट शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सलमान खान आणि या अभिनेत्रीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या घरच्यांनीही या लग्नाला परवानगी दिली होती आणि लग्नाची तारीख ठरली. पत्रिका छापल्या गेल्या पण सलमान खानच्या एका चुकीमुळे त्यांचं लग्न होता होता राहिलं. या नंतर अभिनेत्रीने प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूशी लग्न केलं.
ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून संगीता बिजलानी आहे. 'त्रिदेव' या चित्रपटातील 'गली गील मैं फिरता है' हे सुपरहिट गाणं तुम्ही पाहिलं असेल. याच गाण्यात संगीता झळकली होती. त्रिदेवशिवाय गुनाहों का देवता, विष्णु देवा, युगंधर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केलाय. संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली होती, लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या मात्र लग्नाच्या महिनाभरा सलमान खान दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडला गेला होता.
अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी शाहीन जाफरीला सलमान खान डेट करत होता. सलमान आणि शाहीद अनेकदा मुंबईच्या हॉटेलस सी-रॉक हेल्थ क्लबमध्ये जायचे. संगीता बिजलानीसुद्धा त्या क्लबची रेग्युलर मेंबर होती. त्यावेळी संगीताचं नुकतंच अभिनेता बिंजू अलीशी ब्रेकअप झालं होतं. एकेदिवशी संगीताची भेट सलमानशी झाली. त्यावेळी ती बॉलिवूडमध्ये स्टार होती आणि सलमानने अद्याप पदार्पण केलं नव्हतं. संगीताने सलमानचे वडील सलीम खान यांनी लिहिलेल्या 'जुर्म' चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायला फार वेळ लागला नाही.
संगीता आणि सलमान यांच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. 1989 मध्ये सलमानचा 'मैंने प्यार किया' हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर दोघं लग्नाचा विचार करू लागले. दोघांच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला परवागनी दिली होती. इतकंच नव्हे तर संगीता आणि सलमानच्या लग्नाची तारीखसुद्धा ठरली होती. ही तारीख होती 27 मे 1994. लग्नपत्रिका छापल्या गेल्या... लग्नाला फक्त महिना बाकी होता. मात्र त्याचवेळी संगीताला सलमानच्या काही गोष्टी खटकू लागल्या होत्या.
एका अपार्टमेंटमध्ये सलमान आणि दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रंगेहात संगीताने पकडला. सलमान लग्न ठरलं असतानाही गुपचूप अभिनेत्री सोमी अलीला डेट करत होता. त्याचं हे कृत्य पाहून अभिनेत्रीने लग्न मोडलं.
दरम्यान सलमाननेही नंतर 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये संगीताची फसवणूक केल्याचा खुलासा केला होता. 'एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ होतो. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या', असं सलमान म्हणाला होता. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर संगीताने प्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं. त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला.
IND
387(112.3 ov)
|
VS |
ENG
80/2(24 ov)
|
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.