सलमानचा यूट्यूब चॅनलवर 'बीइंग स्ट्रांग' फिटनेस व्हिडिओ

सलमानने शेअर केला व्हिडिओ 

Updated: Sep 19, 2020, 09:05 PM IST
सलमानचा यूट्यूब चॅनलवर 'बीइंग स्ट्रांग' फिटनेस व्हिडिओ

मुंबई : सलमान खानने नुकताच आपला ब्रँड 'बीइंग स्ट्रॉन्ग' सोबत परिचय करून दिला होता आणि आता, एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे जो फिट राहण्यासाठी वेट लिफ्टिंग आणि जिम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक होणार आहे.

चित्रपट 'वांटेड'च्या अभिनेत्याने आज दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये स्मिथ मशीनच्या सेट अप सोबत टाइम लैप्स मशीनवर एका केबल क्रॉसचे मिश्रण दाखवण्यात आले आहे. 

सलमान यावर अनेक प्रकारचे वर्क आउट एक्सरसाइज़ करताना दिसत आहे, जसे की वार्मिंग फॉर शोल्डर रोटेटर कफ, साइड लेटरल राइजिंग, रोइंग, लैट्स पुल डाउन, चेस्ट पुल डाउन, हैमस्ट्रिंग स्ट्रीच, सिंगल लेग बेंच प्रेस, वेट लेग प्रेस आणि खूप काही यामध्ये सामिल आहे.

व्हिडिओच्या शेवटी, आपण मांसपेशींमध्ये पडलेला फरक पाहू शकतो कारण प्रत्येक एक्सरसाइजमध्ये टप्प्याटप्प्याने त्यावर काम करण्यात आले आहे. अभिनेत्याने निश्चितपणे लॉकडाउनचा सर्वात चांगला उपयोग केला आहे. पहिल्यांदाच अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियावर एक मोठा आणि विस्तृत व्हिडीओ टाकला आहे आणि तो खरोखर खूपच प्रेरणादायक आहे.

अभिनेत्याने नुकताच आपला चित्रपट 'वांटेड'च्या प्रदर्शनाची यशस्वी 11 वर्ष साजरी केली आहेत.