close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलमान खानने सुरक्षारक्षकाच्या कानाखाली वाजवली

सलमान खान बॉडीगार्डवर भडकला

Updated: Jun 5, 2019, 07:24 PM IST
सलमान खानने सुरक्षारक्षकाच्या कानाखाली वाजवली

मुंबई : सलमान खानने भर गर्दीत एका सुरक्षारक्षकाच्या मुस्कटात मारली आहे. सलमान खानचा भारत चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. याच सिनेमाच्या प्रीमिअर शोदरम्यान सलमानला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. सुरक्षारक्षक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चाहत्यांना मागे ढकलत होते. त्यातून वाट काढत थिएटरबाहेर जाताना सलमानने सुरक्षारक्षकाच्याच कानाखाली मारली.

समोर आलेला हा व्हिडिओ मंगळवारी रात्रीचा असल्याचा कळतं आहे. सलमानला पाहण्यासाठी येथे लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सलमान खान सोबत कॅटरीना कैफ, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, कुमुद मिश्रा आणि अतुल श्रीवास्तव देखील उपस्थित होते. 'भारत' सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे.