सलमानने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल केला खुलासा

पण त्या मुलीला सांगण्याची सलमानची हिम्मत नाही झाली

Updated: Jun 5, 2017, 02:49 PM IST
सलमानने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल केला खुलासा title=

मुंबई : अभिनेता सलमान खानने अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव देखील जोडलं गेलं. पण सलमानने पहिल्यांदाच त्याच्या प्रेमाबद्दल जाहीरपणे सांगितलं आहे. सलमान खानचं एका मुलीवर प्रेम होतं पण त्या मुलीला त्याला हे सांगण्याची त्याची हिम्मत नाही झाली.

सलमानने पुढे म्हटलं की, 'ती माझी मैत्रीण होती. पण ती मला लाईक नव्हती करत. ती जेव्हा दुसऱ्याला डेट करायची तर मला खूप त्रास व्हायचा.' पण त्या मुलीचं नाव सलमानने नाही सांगितलं. पण सलमानने म्हटलं की 'ती खूपच सुंदर मुलगी होती. मी तिचं नाव नाही घेऊ शकत पण मला आशा आहे की, ती खूप आनंदी असेल. मी मागील ३५ वर्षांपासून तिला भेटला नाही.'