मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने प्रसिद्ध असणारे फिल्म निर्माता रामगोपाल वर्मा आता नव्या गोष्टीमुळे चर्चेत आलेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'मेरी बेटी सनी लियोनी बनना चाहती है' या व्हिडिओला जोरदार हिट्स मिळत आहेत.
रामगोपाल वर्मा हे सातत्याने वादग्रस्त ट्विट करत असतात. मात्र, त्यांनी महिला सशक्तिकरवर शॉर्ट फिल्म तयार केलेय. ही फिल्म ११ मिनिटांची आहे. ती यू-ट्यूबवर रिलीज केलेय. 'मेरी बेटी सनी लियोनी बनना चाहती है' असं त्या फिल्मचं नाव आहे.
एक मुलगी जेव्हा आपल्या आई-वडिलांना सांगते, मी सनी लियोन होऊ इच्छिते, असे थेट सांगते आणि त्यांना जोरदार धक्का बसतो. आपले म्हणणे ती त्यांना पटवून सांगते. मात्र, आई-वडील तिच्या या भूमिकेने आतून हादरुन जातात...पुढे काय होते ते पाहा