शाहरूखला ठेच, सलमानने घेतला 'धसका'

 किंग खान शाहरुखच्या जब हॅरी मेट सेजल फिल्मला बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशाचा सामना करावा लागला. याचा धसका आता दबंग खानने घेतलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 15, 2017, 10:10 PM IST
शाहरूखला ठेच,  सलमानने घेतला 'धसका' title=

मुंबई :  किंग खान शाहरुखच्या जब हॅरी मेट सेजल फिल्मला बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशाचा सामना करावा लागला. याचा धसका आता दबंग खानने घेतलाय. 

सलमान आणि कतरिनाची टायगर जिंदा है ही फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. फिल्मबाबत सलमान बराच एक्साईट आहे. मात्र शाहरुखच्या अपयशानंतर आता सलमाननेही बॉक्स ऑफिसचा धसका घेतलाय. 

फिल्मचं शूटिंग अजूनही सुरू आहे. सिनेमावर जास्तीत जास्त काम करायचं सलमानने ठरवलंय. खरंतर शाहरुखने फिल्मच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर ठेवलेली नव्हती.

 मात्र तरीही प्रेक्षकांनी या सिनेमाला फारशी उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे प्रमोशनसाठी आता सलमान काय वेगळा फंडा वापरतो, हे पाहणं महत्वाचं ठरणारे.