'या' कारणासाठी चक्क सलमान खानने अल्लू अर्जूनचे मानले आभार

सलमानने अल्लू अर्जुनचे आभार मानल्यानंतर साउथ स्टारने दिले हे उत्तर!

Updated: Apr 27, 2021, 05:01 PM IST
'या' कारणासाठी चक्क सलमान खानने अल्लू अर्जूनचे मानले आभार

मुंबई : यंदाची ईद ब्लॉकबस्टर ठरणार आहे कारण सलमान खानचा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे पहिले गाणे 'सिटी मार'मध्ये स्वत: सलमान आणि दिशा पटानी दिसत आहेत.  

या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता. सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते.  त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये  प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे सर्व गुण आहेत.

जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि उमद्या डांस मूव्स सर्व कसोट्यांना खऱ्या उतरल्या आहेत ज्या बघताना तुम्हीदेखील त्यावर ठेका धरण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत. ‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे, आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड वायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे. 

हे गाणे 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या एका तेलुगु चित्रपटातील हिट गाण्याचे रीक्रिएटेड व्हर्जन आहे आणि जेव्हा की सलमान खान या व्हर्जनमध्ये दिसत आहे, सलमानने अल्लू अर्जुनला 'सिटी मार'साठी धन्यवाद देताना लिहिले की,'धन्यवाद अल्लू अर्जून... सिटी मार.. या गाण्यावर तुझा परफॉर्मन्स अतिशय मस्त आहे. तुझा डान्स, स्टाईल ही अतिशय सुंदर आहे. काळजी घे... तुझ्या कुटुंबाला देखील नमस्कार सांग.

यावर उत्तर देताना अल्लू अर्जुन लिहितो, 'धन्यवाद सलमान गुरू. तुमच्याकडून मिळालेल्या प्रशंसेबद्दल धन्यवाद. यासाठी खूप आभार.'

सलमान खान याच विनम्र स्वभावामुळे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. एकमेकांविषयीचे हे बॉन्डिंग आणि प्रशंसा पाहून दोघांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकाबाजूला जिथे हे चार्टबस्टर गीत 'सिटी मार' चाहत्यांचे मनोरंजन करत आहे, त्याचं वेळी दुसऱ्या बाजूला सलमानच्या जेश्चरने प्रशंसकांची मने जिंकली आहेत.