PHOTO - 'टायगर'चा शर्टलेस फोटो वायरल...

'ओ ओ जाने जाना...' म्हणत स्टेजवर नाचणाऱ्या सलमाननं एकेकाळी तरुणींना वेड लावलं होतं... त्याची तीच क्रेझ तरुणींमध्ये आजही कायम असल्याचं 'टायगर जिंद है'च्या एका वायरल झालेल्या फोटोनंतर दिसून येतंय. 

Updated: Dec 6, 2017, 07:11 PM IST
PHOTO - 'टायगर'चा शर्टलेस फोटो वायरल...  title=

मुंबई : 'ओ ओ जाने जाना...' म्हणत स्टेजवर नाचणाऱ्या सलमाननं एकेकाळी तरुणींना वेड लावलं होतं... त्याची तीच क्रेझ तरुणींमध्ये आजही कायम असल्याचं 'टायगर जिंद है'च्या एका वायरल झालेल्या फोटोनंतर दिसून येतंय. 

'यशराज फिल्म्स'च्या ट्विटर अकाऊंटवरून नुकताच 'टायगर जिंदा है'च्या निमित्तानं सलमानचा एक शर्टलेस फोटो शेअर करण्यात आला. 

या फोटोत सलमान जीममध्ये घाम गाळताना दिसतोय. 'ये है टायगर पॉवर' अशी कॅप्शनही या फोटोला देण्यात आलीय.

या फोटोनंतर सलमानची क्रेझ तरुणींमध्ये आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अनेकींनी 'लव्ह यू टायगर' म्हणत सलमानबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंय.  

उल्लेखनीय म्हणजे 'टायगर जिंदा है'च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळालीय. यूट्युबवर २४ तासांत हा व्हिडिओ २.९ करोड वेळा पाहिला गेला. 

या सिनेमातून सलमान-कतरिना ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. दोघं यापूर्वी 'एक था टायगर' सिनेमात एकत्र दिसले होते. 'टायगर जिंदा है' हा 'एक था टायगर'चा सिक्वल असल्याचं सांगण्यात येतंय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं अली अब्बास जफर यांनी... २३ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.