मोठा लढा जिंकण्यासाठी सलमान रणांगणात; पाहा तो म्हणतोय तरी काय...

पाहा हा नेमका कसला लढा... 

Updated: Nov 17, 2021, 04:32 PM IST
मोठा लढा जिंकण्यासाठी सलमान रणांगणात; पाहा तो म्हणतोय तरी काय...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रुपेरी पडदा गाजवणारा, अभिनेता सलमान खान हा कायमच त्याचं सामाजिक भान जपण्यासाठीही ओळखला जातो. सलमाननं आतापर्यंत कायमच विविध मार्गांनी सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. आता हाच भाईजान पुन्हा एकदा मदतीचा हात देताना दिसत आहे. 

एक मोठी लढाई करण्यासाठीच सलमान रणांगणात उतरला आहे. हा लढा आहे कोरोना विषाणूवर मात करण्याचा, जिथं सलमानचं अस्त्र असणार आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस

एका व्हिडीओच्या माध्यमातून सलमाननं लसीबाबत संभ्रम असणाऱ्या सर्वांच्याच मनातील शंका दूर केल्या आहेत. 

'लसीबाबत काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. ज्यामुळं अनेकांच्या मनातक लसीबाबत संभ्रम निर्माण होत आहे. 

मी सर्वांनाच आवाहन करु इच्छितो की, लसीबाबत कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका. लस घेऊन तुम्ही स्वत:ला, कुटुंबाला आणि देशाला सुरक्षित ठेवत आहात', असं सलमान म्हणाला. 

हात जोडून विनंती करत त्यानं कोरोना लस शक्य तितक्या लवकर घ्या असं आवाहन केलं. सोबतच पुन्हा एकदा त्यानं कोरोना प्रतिबंधात्मक सवयींची आठवण सर्वांनाच करुन दिली. 

दरम्यान, नुकतंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धार्मिक लिडर्स आणि चित्रपट कलाकार यांचा इतरांवर असणारा प्रभाव पाहता त्यांनी लसीकरणाचं महत्त्व पटवून द्यावं अशी आशा व्यक्त केली होती. ज्यानंतर आता सलमानचा हा व्हिडीओ समोर आला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x