21 वर्षांपूर्वी, सलमान खान 18 नोव्हेंबरला करणार होता लग्न, त्यानंतर अचानक मारली पलटी

सलमान खानचे लाखो चाहते अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत. 

Updated: May 5, 2021, 10:50 PM IST
21 वर्षांपूर्वी, सलमान खान 18 नोव्हेंबरला करणार होता लग्न, त्यानंतर अचानक मारली पलटी

मुंबई : बॉलिवूडमध्ये कोणाच्या लग्नाची सर्वात जास्त चाहत्यांना आतुरता असेल तर ती म्हणजे सलमान खानच्या लग्नाची. सलमान खानच्या लग्नाची बातमी बर्‍याचदा समोर आली आहे. मात्र आजपर्यंत त्याने लग्न केलं नाही. सलमान खानने आजपासून 21 वर्षांपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लग्नाच्या शेवटच्या क्षणी त्याने हे लग्न मोडलं. चला, जाणून घेवूया हा मजेदार किस्सा.

सलमान खानचे लाखो चाहते अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत. यावरुन सलमानची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडविली जाते.  स्वत: सलमान वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान लग्न न करण्याची कारण देत मस्ती करत असतो. 55 वर्षीय सलमान खानने अद्याप आपल्या लग्नाचा निर्णय घेतला नाही.

असं म्हटले जातं की, सलमान खान आणि त्याचा मित्र साजिद नाडियाडवाला यांनी लग्न न करण्याची शप्पथ घेतली होती. कपिल शर्माच्या शोमध्ये साजिदनेही हे कबूल केलं होतं. मात्र साजिदने नंतर लग्न केलं मात्र सलमान अविवाहितच राहिला.

नंतर सलमान खानने आपला निर्णय बदलला आणि 1999 मध्ये त्यांनी साजिदला सांगितलं की, आता आपल्याला लग्न करावच लागेल. सलमानने हा निर्णय घेतला होता की, तो त्याच्या अब्बा सलीम आणि अम्मी सल्मा यांच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी 18 नोव्हेंबरला लग्न करेल.

साजिदने सांगितलं की, त्याच्या कुटुंबीयांनी हे लग्न निश्चित केलं होतं. लग्नाच्या पत्रिकाही शापल्या गेल्या होत्या, मात्र लग्नाच्या 5 दिवस आधी सलमान उलटला आणि लग्न करण्यास त्याने नकार दिला. मात्र साजिद लग्नाला नकार देऊ शकला नाही. त्यांचं लग्न निश्चित झालं होतं.

साजिदला सलमान म्हणाला  - जर तुला पळायचं असेल तर गाडी रेडी आहे
कपिल शर्माच्या शोमध्ये साजिदने सांगितलं की, सलमान जेव्हा त्याच्या लग्नात आला होता. तेव्हा तो जवळ आला आणि त्याच्या कानात म्हणाला की, लग्नापासून पळून जायचं असेल तर गाडी बाहेर तयार आहे. मात्र सलमान केवळ त्यांची गंमत करत होता. लग्नासाठी त्याने साजिदचं अभिनंदन केलं.

संगीता बिजलानीशी ठरलं होतं सलमानचं लग्न
1994मध्ये सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचं लग्नही निश्चित झालं होतं. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. असं म्हणतात की, संगीताने लग्नापूर्वी सलमानला चिट  केलं होतं. त्यानंतर सलमानने हे लग्न मोडलं. सलमानने स्वतः कॉफी विथ करणमध्ये कबूल केलं होते की, त्यावेळी त्याला लग्न करायचं होतं.