'त्या' रात्री श्रीदेवी आपल्या खोलीत दारुच्या नशेत संजय दत्तला पाहून घाबरल्या होत्या

संजय दत्तची अशी वागणूक पाहून श्रीदेवी यांना खूप वाईट वाटल होतं.

Updated: May 5, 2021, 08:57 PM IST
'त्या' रात्री श्रीदेवी आपल्या खोलीत दारुच्या नशेत संजय दत्तला पाहून घाबरल्या होत्या

मुंबई : अनेक वर्षांनंतर आजही हिंदी चित्रपटांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कमालीची पाहायला मिळते. आजही जुन्या चित्रपटांतील कपल लोकांच्या ह्रद्यावर राज्य करतात. तसंच, बऱ्याच वर्षांनंतरही प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. काही ऐकल्या नसलेल्या गोष्टीही ऐकायला आवडतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची अशीच एक गोष्ट सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

संजय दत्तला लागलं होतं श्रीदेवी यांचं वेड
ही गोष्ट आहे 80च्या दशकातली. जिथे श्रीदेवी त्या काळातील सुपरस्टार बनल्या होत्या. त्याचवेळी अभिनेता संजय दत्त त्याचं फिल्मी करियर बनवत होता. असं म्हणतात की, त्यावेळी संजय दत्तला श्रीदेवी यांना भेटायचं होतं. याच दरम्यावन, एकाने संजय दत्तला सांगितले की, श्रीदेवी 'हिम्मतवाला' चित्रपटाच्या शूटिंगसाठी आल्या आहेत. हे ऐकून संजय दत्त स्वत:ला रोखू शकला नाही. संजय त्यांना भेटण्यासाठी सेटवर पोहोचला.

दारुच्या नशेत संजय दत्त घुसला श्रीदेवी यांच्या खोलीत
असं म्हटलं जातं की, संजय दत्त जेव्हा श्रीदेवी यांना भेटायला सेटवर आला तेव्हा तो नशेत होता. संजय दत्त नीट उभा राहू शकत नव्हता. त्याने सेटवर उपस्थित असलेल्या लोकांना श्रीदेवी यांची सेटवरील खोली कुठे असल्याचं विचारलं.  कुणाला काही न सांगता त्याने  श्रीदेवी यांच्या खोलीत प्रवेश केला.

संजय दत्तला आपल्या खोलीत दारू प्यायलेलं पाहून श्रीदेवी घाबरल्या. असं म्हणतात की, संजय दत्तची अशी वागणूक पाहून श्रीदेवी यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी ठरवलं की, त्या आयुष्यात कधीच संजय दत्तला भेटणार नाही.

श्रीदेवी यांनी संजय दत्तसोबत दोन चित्रपट साइन केले
वेळ निघून गेली आणि संजय दत्तने कालांतराने आपल्या सुपरहिट चित्रपटांद्वारे इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमवायला सुरुवात केली. बघता-बघता संजय दत्त सुपरस्टार झाला. त्यानंतर संजय दत्तला 'जमीन' या चित्रपटात साइन केलं होतं. आश्चर्य म्हणजे श्रीदेवी यांनाही या सिनेमात साइन केलं होतं. आता जेव्हा संजय दत्त सुपरस्टार झाला.

अशा परिस्थितीत श्रीदेवीसुद्धा त्याच्याबरोबर एखादा चित्रपट करण्यास नकार देऊ शकल्या नाहीत. असं म्हणतात की, श्रीदेवी यांनी हा चित्रपट साईन करण्याआधी बर्‍याच अटी समोर ठेवल्या होत्या. ज्यामुळे हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. त्याच वेळी नशिबाने पुन्हा एकदा संजय आणि श्रीदेवी यांना एकत्र आणलं.

'गुमराह' सिनेमांत श्रीदेवी आणि संजय दत्त यांना साईन करण्यात आलं होतं. मात्र शूटिंगच्या सेटवर दोघांमध्येही नेहमीच वाद-विवाद व्हायचे. हा चित्रपट मोठ्या अडचणींवर मात करत पूर्ण झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनाही ही जोडी आवडली होती.