Salman Khan in Singham 3: बॉलिवूड चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या 'सिंघम अगेन' (Singham Again) चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटात कलाकारांची अक्षरश: फौज दिसणार आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टाइगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, दीपिका पादुकोण आणि करीना कपूर या चित्रपटात दिसणार आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शक असल्याने या चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्व अभिनेते दिसत आहेत. पण या चित्रपटात आणखी एक मोठा चेहरा झळकणार आहे, जो ट्रेलरमध्ये दिसलेलाच नाही.
हा मोठा अभिनेता नेमका कोण असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. सिंघम अगेनची घोषणा झाली तेव्हाच सलमान खान या चित्रपटात पाहुण्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. म्हणजेच चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टाइगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, दीपिका पादुकोण आणि करीना कपूर यांच्यासह सलमान खानही अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सिंघम अगेन' चित्रपटात सलमान खान चुलबूल पांडेची भूमिका निभावताना दिसणार आहे.
सिंघम हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा भाग आहे. याच चित्रपटापासून याची सुरुवात झाली होती. सिंघम आणि सिंघम 2 ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. 2011 मध्ये सिंघम चित्रपट रिलीज झाला होता. एका पोलीस अधिकाऱ्यावर हा चित्रपट आधारित आहे. सिंघमनंतर 2014 मध्ये सिंघम अगेन, 2018 मध्ये सिम्बा आणि 2021 मध्ये सूर्यवंशी हे चित्रपट रिलीज झाले होते. 2024 च्या दिवाळीत 'सिंघम अगेन' रिलीज होणार आहे. या चित्रपटासोबत कार्तिक आर्यन आणि विद्या बालनची मुख्य भूमिका असणारा 'भूल भुलैय्या 3' रिलीज होणार आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More
LIVE|
AFG
187/6(20 ov)
|
VS |
SA
164/7(17.5 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 190/9
|
VS |
USA
158/8(20 ov)
|
| Pakistan beat USA by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 113/7
|
VS |
QAT
115/3(16.4 ov)
|
| Qatar beat Bahrain by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 173/6
|
VS |
NZ
175/0(15.2 ov)
|
| New Zealand beat United Arab Emirates by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.