Throwback Friday म्हणत सलमान खानच्या 'खास व्यक्ती'नं शेअर केला फोटो

सलमान खानसाठी ही व्यक्ती खूप जास्त खास आहे.

Updated: Mar 13, 2021, 03:40 PM IST
Throwback Friday म्हणत सलमान खानच्या 'खास व्यक्ती'नं शेअर केला फोटो title=

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा (Shera)  यांच्यातील केमिस्ट्री सर्वांनाच माहिती आहे. दोघांचे नातं बॉलिवूडमधील कथांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत जेव्हा  शेराने (Salman Khan’s Bodyguard Shera) सोशल मीडियावर काही शेअर केले तर ते त्वरित व्हायरल होते. आता शेराने सलमान खानच्या आगामी 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) चित्रपटाचा एक लूक शेअर केला आहे.

'अंतिम' च्या पॅकअपचा फोटो
या फोटोत सलमान खानचा (Salman Khan) लूक एकदम वेगळा दिसत आहे. हा फोटो 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) चित्रपटाच्या सेटचा आहे. नुकतेच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं आहे. लोकांना या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Being Sheraa (@beingshera)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Being Sheraa (@beingshera)

असा आहे सलमानचा लूक या फोटोत सलमान खान आणि शेरा एकत्र उभे दिसत आहेत. फोटोत सलमान हॅण्डसम दिसत आहे. त्याने काळ्या रंगाची बनियन डेनिम पॅन्ट तसेच लाल पगडी, मनगटावर ब्रेसलेट आणि जाड साखळी घातली आहे. हातात एक कॉफी कप देखील दिसतो.

काय दिले कॅप्शन
हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत शेरानं कॅप्शनमध्ये लिहिले आहे, थ्रोबैक फ्राइडे @Beingsalmankhan #SalmanKhan #Sheraa #Beingsheraa #Antim'. सलमानबरोबरच आयुष शर्मादेखील ‘अंतिम’ या चित्रपटात दिसणार आहे.

सलमान यानंतर ‘कभी ईद कभी दिवाळी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमान खानने 'राधे: तेरा मोस्ट वांटेड भाई' चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्यांच्यासह दिशा पटानी दिसणार आहेत. हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.