घटस्फोटाच्या चर्चेला उधाण, सामंथा पती नागा चैतन्य विनाच तिरुपतीच्या दर्शनाला

साऊथची अभिनेत्री सामंथा अक्किनेनीच्या वैवाहिक जीवनात तणावाच्या बातम्या या दिवसांमध्ये खूप व्हायरल आहेत.

Updated: Sep 19, 2021, 01:37 PM IST
घटस्फोटाच्या चर्चेला उधाण, सामंथा पती नागा चैतन्य विनाच तिरुपतीच्या दर्शनाला

मुंबई : साऊथची अभिनेत्री सामंथा अक्किनेनीच्या वैवाहिक जीवनात तणावाच्या बातम्या या दिवसांमध्ये खूप व्हायरल आहेत. असे असूनही, चित्रपट अभिनेत्री सामंथा अक्किनेनी आणि तिचा पती नागा चैतन्य मौन बाळगून आहेत. त्यात आता  अलीकडेच फिल्म स्टार सामंथा अक्किनेनी तिरुपती बालाजी मंदिरामध्ये तिच्या टीमसोबत पोहोचली होती.

या काळात तिचा पती नागा चैतन्य तिच्यासोबत नव्हता. अशा स्थितीत, सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या नात्यातील तणावाच्या बातम्यांना अधिकचं जोर आल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य या विषयावर माध्यमांशी बोलण्यापासून सतत दूर जात आहेत.

तेलुगू स्टार नागा चैतन्यनेही अलीकडेच त्याच्या लव्हस्टोरी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांना सक्त सूचना दिल्या होत्या की सामंथाबद्दल कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नयेत. अशा परिस्थितीत लोकांच्या नजरा या स्टार जोडप्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आहेत. तिरुपती मंदिराच्या प्रवासादरम्यानही अभिनेत्रीने माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला.

पण या दरम्यान एका स्थानिक पत्रकाराने अभिनेत्रीला तिच्या आणि नागा चैतन्याच्या घटस्फोटाच्या बातमीबद्दल प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री भडकली आणि तेलुगू भाषेत पत्रकाराला फटकारले. सामंथा अक्किनेनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.