समंथा- हृतिकचं काय कनेक्शन, Photo Viral झाल्यामुळं गोंधळ

फोटोनं अनेक चर्चांना उधाण   

Updated: Dec 24, 2021, 04:25 PM IST
समंथा- हृतिकचं काय कनेक्शन, Photo Viral झाल्यामुळं गोंधळ  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांचं नशीब आजमावलं आहे. त्यातच आता समंथाचं नावही जोडलं जात आहे. मागच्या काही दिवसांपासून समंथाच्या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच आता म्हणे समंथा आणि हृतिकला एकत्र पाहिलं गेलं आहे. त्यामुळे भलत्याच चर्चांनी आता गोंधळ उडवला आहे. 

तुम्ही कोणत्या समंथाचा विचार करताय? 

नाही नाही, जी समंथा तुम्ही समजताय ती ही नव्हे. तर, हृतिकसोबत दिसलेली ही समंथा म्हणजे परदेशी अभिनेत्री समंथा लॉकवूड. 

खुद्द समंथानंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत सर्वांच्या नजरा वळवल्या. 

हृतिक आणि समंथा येत्या काळात कोणत्या प्रोजेक्टमधून झळकणार का, असाच प्रश्न काही चाहत्यांनी उपस्थित केला. 

कोण आहे समंथा लॉकवूड? 
28 एप्रिल 1992 ला जन्मलेली समंथा एक अमेरिकन अभिनेत्री आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातून तिनं शिक्षण घेतलं आहे. 

हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री मागच्या काही दिवसांपासून भारत दौऱ्यावर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.