Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

असेच एकाहून एक उत्तोमोत्तम चित्रपट केल्यामुळे सध्या समांथाची क्रेझ सगळीकडे वाढली आहे. टॉलिवूडमधील ती एक मोठी लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेव्हा समोर आलेल्या माहितीनूसार ती सध्या आपल्या फीज वाढवण्याच्या विचारात आहे. 

Updated: Oct 26, 2022, 11:47 AM IST
Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?  title=

Samantha Ruth Prabhu Increased Fees: दाक्षिणात्त्य सुपरस्टार असो वा बॉलिवूडचे चार्मिंग हिरोज... त्यांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या अवाढव्य फीजची आणि रिलेशनशिप्सची सर्वाधिक चर्चा होते. सध्या अशीही माहिती समोर येते आहे की बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्त्य सिनेसुपरस्टार सर्वाधिक मानधन घेतात. आजकाल अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे जिचं नावं आहे समांथा रूथ प्रभु. आज समांथाला कोण ओळखत नाही. 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंतवा' या आयटम नंबर गाण्याच्या लोकप्रियतेनंतर ती पॅन इंडियाची स्टार बनली आहे. दाक्षिणात्त्य चित्रपटांसोबतच तिनं लोकप्रिय अशा 'द फॅमिली मॅन', 'जानू' या चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

असेच एकाहून एक उत्तोमोत्तम चित्रपट केल्यामुळे सध्या समांथाची क्रेझ सगळीकडे वाढली आहे. टॉलिवूडमधील ती एक मोठी लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेव्हा समोर आलेल्या माहितीनूसार ती सध्या आपल्या फीज वाढवण्याच्या विचारात आहे. 

मीडिया रिपोर्टनूसार, समंथा रुथ प्रभूची इंडस्ट्रीमधली तिची मागणी प्रचंड वाढली आहे त्यामुळे आता ती आपल्या फीजही वाढवण्याच्या उद्देशानं पाऊलं टाकते आहे. पूर्वी ती एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये घेत होती, आता तिनं तीच 3 ते 8 कोटी रुपये एवढी केली आहे. समंथा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनाही आहे. 

समंथाच्या आगामी 'यशोदा' या चित्रपटाच्या नवीन पोस्टरनेही चाहते खूप उत्सुक आहेत. या सिनेमाचे पोस्टरही रिलिज झाले आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तीही खूप उत्सुक असल्याचं दिसते आहे. तिचे चाहतेही 'यशोदा' च्या ट्रेलरबद्दल उत्सुक आहेत जो 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:36 वाजता प्रदर्शित होणार आहे.

नुकताच 'यशोदा' चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला ज्याची खूप चर्चा झाली. टीझरमध्ये समंथा रुथ प्रभू एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटात ती एका एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. 1 मिनिट 14 सेकंदाच्या टीझरमध्ये सस्पेन्ससह जबरदस्त थ्रिलर पाहायला मिळाला. 'यशोदा' व्यतिरिक्त समंथा गुणशेखर लिखित आणि दिग्दर्शित 'शाकुंतलम'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा शकुंतला (समंथा) आणि राजा दुष्यंत (देव मोहन) यांच्या प्रेमकथेभोवती फिरते.

समांथा लवकरच 'शाकुंतलम', 'यशोदा', 'कुशी', 'प्रेम की विरासत' यांसारख्या चित्रपटांमधून दिसणार आहे.