मुंबई : दक्षिण चित्रपट अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची बातमी जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हे दाक्षिणात्य चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय जोडपे मानले जात होते. चित्रपटातील कलाकार सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये लग्न केले. या दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम होते. त्यांनी काही वर्ष एकमोकांना डेट केलं, ज्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
नागा चैतन्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सामंथाने तिच्या शरीरावर अनेक टॅटू देखील बनवले होते. नागा चैतन्य एक अतिशय लाजाळू व्यक्ती असल्याते मानले जाते. पण तो आपल्या पत्नी समंथावरील प्रेम उघडपणे व्यक्त करण्यास मागे हटला नाही.
विशेष म्हणजे दोन्ही स्टार्सनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टॅटूचा सहारा घेतला. समांथाने नागा चैतन्यसाठी तिच्या शरीरावर 3 टॅटू काढले. तर नागा चैतन्याने देखील सामंथासाठी एक टॅटू काढला.
अभिनेत्री सामंथाने आपल्या पाठीवर मानेच्या खाली एक गोंडस टॅटू काढला आहे. जो एक इनीशियल आहे. यामध्ये स्टाईलिश शैलीत YMC लिहिलेले आहे. समंथा आणि नागा चैतन्य यांचा पहिला चित्रपट 'ये माया चेसवा'चं हे इनीशियल आहे. अभिनेत्रीने याला आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून आपल्या शरीरवर बनवले होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोन स्टार्सचं एकमेंकावर प्रेम जडलं.
सामंथा रूथ प्रभूच्या मनगटावर एक अतिशय सुंदर टॅटू आहे. यात दोन बाण आहेत जी वरच्या दिशेने जात असल्याचे दिसते. हा टॅटू अभिनेत्रीने नागा चैतन्यसह केला होता.
नागा चैतन्यनेही आपल्या मनगटावर तसाच टॅटू काढून गेतला होता आणि आपलं सामंथा रूथ प्रभूवरील प्रेम व्यक्त केलं. दोन्ही स्टार कपल प्रेमात अनेक वेळा हा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसले.
तसेच सामंथाने एक हिडन टॅटू देखील काढला होता. ज्याला नंतर फोटोशूट दरम्यान अभिनेत्रीने सगळ्यांसमोर आणलं. अभिनेत्रीने तिच्या बरगडीवर चैतन्यच्या नावाचे स्पेलिंग ‘Chay’ असं लिहलं आहे.