मुंबई : टीव्ही कपल मोहित सेहगल आणि सनाया ईराणी यांचे लग्न 25 जानेवारी 2016मध्ये झाले होते. गुरुवारी त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली.
अभिनेता मोहितने इन्स्टाग्रामवर सनायाला रोमँटिक अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनी एकमेकांना किस करताना एक फोटो पोस्ट केला. या दोघांची जोडी टीव्ही दुनियेत हिट आहे.
सनायाने मोहितसाठी एक व्हिडीओ पोस्ट केलाय. तसेच आपल्या आयुष्यात आल्याबद्दल आभार व्यक्त केलेत.
मोहित-सनाया टीव्हीच्या प्रसिद्ध जोडीपैकी एक आहे. दोघांनी नच बलिये 8मध्येही सहभाग घेतला होता. टीव्हीवरील हे जोडपे सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
मोहित आणि सनाया मिले जब हम तुमच्या सेटवर भेटले होते. तेव्हापासून त्यांची रोमँटिक लव्हस्टोरी सुरु झाली. 2016मध्ये या दोघांनी गोवा येथे डेस्टिनेशन वेडिंग केले. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.