कोरोना काळात रूग्णांसाठी अभिनेता बनला ऍम्ब्युलन्स चालक

कोरोनाबाधितांसाठी बनला चालक 

Updated: May 10, 2021, 04:22 PM IST
कोरोना काळात रूग्णांसाठी अभिनेता बनला ऍम्ब्युलन्स चालक

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. कधी कोरोनामुळे तर कधी ऑक्सिजन, बेड किंवा ऍम्ब्युलन्सच्या अभावामुळे अनेकांनी आपला किंवा आपल्या जवळच्यांचा जीव गमावला आहे. अशा परिस्थिती एक लोकप्रिय अभिनेता चक्क ऍम्ब्युलन्स चालक बनला आहे.  हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून कन्नड अभिनेता अर्जुन गौडा आहे.

अर्जुन म्हणाला की खूप दिवसापासून मी कोरोना झालेल्या लोकांचे हाल पाहत आहे. यामुळेच मी ऍम्बुलन्स चालवून लोकांची सेवा करत आहे, मी रुग्णांना ऍम्बुलन्समधून दवाखान्यात पोहचवतो यापुढे देखील हे मी काम करत राहणार आहे. तसेच मी या रुग्णांना कोणीच भेटायला येत नव्हत म्हणून त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा मी केले आहे आणि यापुढे ही करत राहीन.

कोरोनाने भारतात पुन्हा आपलं डोकं काढलं आहेत अशात अनेक राज्यात कडक लॉकडाउनचे आदेश सरकारकडून जाहीर झाले आहेत. पण यामुळे सगळयांना पुन्हा पोटाची भूक मारून राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत अनेक कलाकार मदतीचा हात पुढे करत आहेत. 

मात्र मागील वर्षी कोरोनाने जेव्हा भारतात शिरकाव केला होता. तेव्हा अभिनेता सोनू सूद याने पहिला मदतीचा हात पुढे केला होता. मागच्या लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूद पुढे येत त्याने खूप लोकांची मदत केली त्यांना आपल्या घरी सुखरूप पोहचवले, त्याचबरोबर रिलायन्स फाउंडेशन आणि टाटा कंपनीने देखील भारताला ऑक्सिजन साठी मोठी मदत केली.

यावेळी सोनू सूदने काही पैशांची मदत केली नाही तर जेवण अन्नदान करून मदत केली. पण या अशा परिस्थिती सुद्धा सोनूवर टीका झाल्या. यात सुद्धा राजकारण रंगले लोक सांगू लागले की सोनू भाजपासाठी हे काम करत आहे, सोनू सूदने त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली पण त्याने आपल्या कामाचा ओघ कमी केला नाही,

परंतु हेच काम करता करता सोनूला कोरोनाची लागण झाली, परंतु त्यानंतर तो कालांतराने बरा सुद्धा झाले, या महामारी वेळी अनेक सेलेब्रिटीने पुढाकार घेत मदत केली आहे