Sandeep Pathak Frying Bhaji Video: भजी खायला आपल्या सर्वांनाच आवडतं. त्यातून गरमागरम भजी खाऊन मस्तपैंकी आपल्याला आपला विकेंडही एन्जॉय करायचा असतो. त्यामुळे अशावेळी चर्चा असते ती म्हणजे कुठे जवळपास चांगला भजीवाला आपल्याला भेटतो आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये आपण पाहू शकता एक लोकप्रिय अभिनेता हा चक्क भजी तळताना दिसतो आहे. मराठी-हिंदी अभिनेते अभिनेत्री अनेकदा असे प्रयोग करताना दिसतात. त्यातून त्यांची बरीच चर्चा रंगलेली असते. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे या अभिनेत्याची. प्रत्येकवेळी तुमच्याआमच्यासारखंच काम करताना हे अभिनेते - अभिनेत्री दिसले की मग आपल्यालाही समजते की हेही आपल्यासारखेच आहेत. परंतु काही नेटकरी मात्र यावर लगेचच हे फक्त पब्लिसिटी स्टंट्स आहेत. नवा चित्रपट येणार आहेत म्हणून हे सगळं करत आहेत असं म्हणतात.
परंतु हा व्हिडीओ पाहून तुमचं मत हे नक्कीच बदलेल. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि या व्हिडीओखाली सर्वच फॅन्स सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा अभिनेता आहे संदीप पाठक. संदीप पाठक हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यातून त्यानं नाटक, मालिका आणि सिरियल्स, ओटीटी या सर्वच माध्यमांवरून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. तो इन्टाग्रामवरही चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्याच्या या व्हिडीओ चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
हेही वाचा : फोटोतला 'हा' चिमुरडा आहे लोकप्रिय दिग्दर्शक! ज्याचा प्रत्येक चित्रपट पोहचला 100 Crore Club मध्ये
''सर, कालचा शो एक नंबर... खळखळून हसलो..!!'', ''गरिबीची जाण असलेला माणूस'', ''परवा धाराशिवला झालेला वऱ्हाड निघालंय लंडनला नाटकाचा प्रयोग माझ्या आईवडीलांनी आवर्जून पाहीला आणि त्यांना प्रयोग आणि तुमचा अभिनय खुप आवडला तसं दादा तुमचं कौतुक आम्हा मराठवाड्यातल्या प्रेक्षकांना आहेच…..खुप छान वाटलं तुम्ही आमच्या धाराशिव ला प्रयोग केला'',
''कलाकार असावा तर असा मनमोकळा स्वभावाचा..'', ''भजी कशी दिली दादा'','' वीडियो पाहून अस समझल की संदीप पाटक हा सेलिब्रिटी असुन पन गरीब लोकाना सपोर्ट करतो एक नंबर'', ''खर तर तुमचे खुप खुप आभार सर अभिनय क्षेत्रात उतुंग भरारी घेतली असताना जनसामान्य माणसात अगदी सहज रमतात.'' ''सर या व्हिडिओ ने सामान्य आणी होतकरू मुलांचा व्यवसाय साठीचा दृष्टिकोन नक्कीच बदलेलं'', संदीप भाऊ जमलं तुम्हाला पण, काय झकास भजे तळलेत राव तुम्ही'',''आमच्या संदीप दादा चा नादच खुळा'', अशा नानाविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.