मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी 'दिल बेचरा' चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघीची देखील चौकशी करण्यात आली . मंगळवारी संजना चौकशीसाठी वांद्रे येथील पोलीस स्थानकात पोहोचली दाखल झली. तब्बल ९ तास पोलिसांनी संजनाची चौकशी केली. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सुशांतवर लावण्यात आलेल्या मीटूच्या आरेपांविषयी चौकशी केली. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान तो कोणत्या मानसिक तणावाखाली होता का? अशा अनेक विषयांवर चौकशी करण्यात आली.
संजना संघीने दिलेल्या जबाबमध्ये समोर असं समोर आलं की, २०१८ साली कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी ऑडिशननंतर मुख्य अभिनेत्री म्हणून संजनाची निवड केली. शिवाय चित्रपटाचं दिग्दर्शन देखील छाब्रा यां
याबाबतीत संजना म्हणाली 'मला नंतर माहिती झालं चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून सुशांत सिंह राजपूत आहे. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान पहिल्यांदा माझी आणि सुशांतची भेट झाली.' शिवाय संजनाने सुशांतवर मीटूचे आरोप लावले नसल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.
'मी सुशांतवर कोणत्याही प्रकारचे मीटूचे आरोप लावले नाहीत. जेव्हा या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत होत्या तेव्हा मी अमेरिकेत माझ्या आईसोबत फिरत होते. पुन्हा भारतात आल्यानंतर मला समजलं की अशा चर्चा पसरत आहेत.' तो सेट वर सर्वांसोबत चांगलं बोलायचा. तो कोणत्या मानसिक तणावाखाली जगत आहे असं कधी वाटलं नसल्याचं देखील संजनाने चौकशीत स्पष्ट केले.