मुंबई : अभिनेता संजय दत्तने अनेक सिनेमांमध्ये भन्नाट भूमिका साकारल्या. कधी हिरो तर कधी खलनायकाच्या भूमिकेत संजूबाबाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण आता तर संजय दत्त 'केजीएफ चॅप्टर 2' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय दत्तचं हे धडकी भरवणारं रुप, त्याच्या जीवावर बेतलं असतं, पण त्यानेही जीव ओवाळून टाकणारी भूमिका अखेर साकारलीच.... संजूबाबाला पाहाण्यासाठी चाहते देखील उत्सुक असते.
नुकताचं सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ट्रेलरमधील त्याची एक झलक चाहत्यांना थक्क करून गेली. वयाच्या 62 व्या वर्षी संजूबाबाचं भन्नाट बॉडी ट्रांसफॉर्मेशन सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांनाही मागे टाकेल. पण ही भूमिका त्याच्या जीवावर उठली असती.
सिनेमात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. ट्रेलर लाँचच्या वेळी भूमिकेबद्दल बोलताना संजय दत्त म्हणाला की, तो त्याच्या तब्येतीमुळे घाबरला होता. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त कर्करोगाशी लढा देत होता. त्यामुळे संजय दत्तची ही भूमिका जीव धोक्यात टाकणारी होती असं म्हणायला हरकत नाही.
संजय दत्तने अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकराली. 'बल्लू बलराम प्रसाद' आणि 'अग्निपथ' नंतर संजय आता 'केजीएफ चॅप्टर 2' मध्ये 'अधीरा' म्हणून खलनायकाच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे.
14 एप्रिलला सिनेमा कन्नड, तेलुगू,हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे. प्रशांत नीलची पटकथा आणि दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमामध्ये अभिनेता रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्याही निर्मिती संस्थेची गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे.