संजय दत्त बागेश्वर बाबांची भेट घेतल्यानंतर म्हणाला, 'ही जागा कमाल आहे मी...'

Sanjay Dutt Bageshwar Dham :  संजय दत्तचा बागेश्वर धाममधील व्हिडीओ आला समोर...

दिक्षा पाटील | Updated: Jun 16, 2024, 02:22 PM IST
संजय दत्त बागेश्वर बाबांची भेट घेतल्यानंतर म्हणाला, 'ही जागा कमाल आहे मी...' title=
(Photo Credit : Social Media)

Sanjay Dutt Bageshwar Dham : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त नुकताच मध्य प्रदेशमध्ये असलेल्या छतरपुर येथे स्थित असलेल्या बागेश्वर धाम पोहोचला होता. त्यावेळी त्यानं बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्याशिवाय संजय दत्तनं बालाजीची परिक्रमा देखील केली. तर दुसरीकडे बागेश्वर धाममध्ये त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यानं सांगितलं की आता तो परत-परत तिथे येईल. संजय दत्तनं त्याशिवाय बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची देखील भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद देखील घेतला. आता सोशल मीडियावर संजय दत्त आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  

संजय दत्तनं बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीची भेट घेतली. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्याला संपूर्ण बागेश्वर धाम दाखवलं. त्याचाच हा व्हिडीओ आहे. दरम्यान, 'आजतक' नं दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तनं म्हटलं की महाराजजींना भेटून त्याला असं वाटलं की जणू तो त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात चांगला आणि लक्षात राहणाऱ्या आठवणींमधील एक आहे. संजय दत्तनं म्हटलं की आता तो पुन्हा - पुन्हा बागेश्वर धाम जाईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संजय दत्त हा खूप कमी प्रवास करतो. मुंबईत राहून तो त्याच्या फिटनेस आणि चित्रपटांवर लक्ष देतो. नेहमीच संजय दत्त त्यांचे जिम व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. इतकंच नाही तर त्यावरून त्याच्या आयुष्यात फिटनेसला किती महत्त्व आहे हे सगळ्यांना कळतं. चाहचे देखील त्याला इंस्पीरेशन मानतात. त्यासोबत अनेकदा त्याची स्तुती देखील करतात. 

हेही वाचा : सोनाली बेंद्रेचा जीव घेण्यासाठी तयार होत्या सरोज खान! अभिनेत्रीनं सांगितला 'हम्मा हम्मा' गाण्याचा 'तो' किस्सा

संजय दत्तच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर त्याच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. लवकरच तो 'घुडचढी' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा खूप आधी करण्यात आली होती. या चित्रपटात संजय दत्तसोबक रवीना टंडन आणि पार्थ समथान देखील दिसणार आहे. या शिवाय संजय दत्तकडे 'मास्टर ब्लास्टर' या चित्रपटाच त्याच्यासोबत टायगर श्रॉफ दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन फिरोज नाडियाडवाला आहेत. 'डबल स्मार्ट' मध्ये दिसतात. हा एक तेलगू चित्रपट आहे. त्याशिवाय 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपटही आहे. 2024 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांमध्ये हा आहे.