मुंबई : सुशांतच्या बिहार सरकार आणि केंद्र सरकारकडून राजकारण होत आहे. मुंबई पोलीस याबाबत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकं रहस्य लपवण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत. महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आज सामनातून यावर प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर मग मतं मांडावे आणि टीका करावी, देशात लोकशाही आहे. कोणाचे हात कुठेपर्यंत पोहोचले आहे हे आम्हाला माहित आहे. असं ही राऊतांनी म्हटलं आहे.
४० दिवसांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल होते. सीबीआयकडे प्रकरण सोपवण्याची मागणी करत बिहारचे मुख्यमंत्री यात पडतात. हा घटनाक्रम पाहिल्यावर हे कोणीतरी लिहितंय असं वाटतं. मुंबई पोलिसांचं काम स्कॉटलंडच्या पोलिसांच्या तोडीचं आहे. त्यांना तपास करून घ्यायचा नाही, म्हणून हे कारस्थान सुरु आहे. पण जे घेराबंदी करत आहेत ते स्वतःच अडकतील. सीबीआयला क्वारंटाईन केलं जावं याबाबत काही माहिती नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बिहारचे डीजीपी एका पक्षाचे नेते होते. त्यांनी निवडणूक लढवली होती. अशा पोलीस अधिकाऱ्यापासून काय अपेक्षा करु शकतो. अशी टीका त्यांनी बिहार पोलिसांनी केली आहे.
सुशांत सिंह किती वेळा पटनाला गेला होता. चौकशीला वेगळी दिशा देण्याचं षडयंत्र सुरु आहे. सुशांतचं वैयक्तिक जीवन सार्वजनिक केलं जात आहे.
बेळगावातून महाराजांचा पुतळा रात्रीत हटवला त्या कर्नाटक सरकारचा धिक्कार आहे. यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष बोलत नाही. बेळगावात विरोधी पक्ष नेत्यांसोबत आंदोलन करायला तयार आहोत. ते येणार का हे त्यांना विचारा असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
मराठा उपसमितीतून अशोक चव्हाणांना हटवावं का? हा माझा विषय नाही. यावर मंत्री एकनाथ शिंदे हे बोलतील. ते त्या समितीत आहेत. सरकार योग्य काय तो निर्णय घेईल. असं ही संजय राऊतांनी म्हटलं आहे.