संजू सिनेमाचे नवे पोस्टर आऊट...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच संजू सिनेमात झळकणार आहे.

Updated: May 26, 2018, 12:52 PM IST
संजू सिनेमाचे नवे पोस्टर आऊट...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच संजू सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचा टीझर गेल्या महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. संजय दत्तच्या लूकमधील रणबीर कपूर प्रेक्षकांना चांगलाच भावला. आता त्याचे नवनवे पोस्टर्स समोर येऊ लागले आहेत. २५ मे ला सोनम कपूरचा लूक शेअर करण्यात आला. त्यानंतर आता परेश रावलचा लूक समोर येत आहे.

वडील मुलाचे नाते

संजू सिनेमात परेश रावल, संजय दत्तच्या वडीलांची म्हणजेच सुनील दत्त यांची भूमिका साकारत आहे. पोस्टरवर रणबीर खूप घाबरलेला दिसत आहे. तर परेश रावल यांनी त्याला मिठीत घेतले आहे. यातून मुलगा आणि वडील यांच्यातील बॉन्डींग दिसते. त्याचबरोबर संजूच्या वाईट काळात वडीलांनी त्याला कसे सांभाळले हे ही दिसून येते. पहा सिनेमाचे नवे पोस्टर...

 

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमात रणबीर कपूरशिवाय परेश रावल, दिव्या दत्ता, सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि करिश्मा तन्ना यांसारखे कलाकार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून हा सिनेमा २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.