संजय दत्तवरील सिनेमा 'संजू'चा ट्रेलर रिलीज

 या सिनेमात संजय दत्तविषयी अनेक वादग्रस्त गोष्टी पुन्हा नव्याने चर्चेने येण्याची शक्यता वाढली आहे.

Updated: May 30, 2018, 02:21 PM IST

मुंबई : अभिनेता संजय दत्तवरील सिनेमा संजूचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात संजय दत्तविषयी अनेक वादग्रस्त गोष्टी पुन्हा नव्याने चर्चेने येण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील अनेक मुद्यांवर देखील उजेड पडणार आहे. यात संजय दत्तसाठी सुनील दत्त यांचा कळवळा देखील दिसून येत आहे, संजू सिनेमाचा ट्रेलर ज्या पद्धतीने दिसून येत आहे, यात संजय दत्तच्या आयुष्यातील कोणतीच गोष्ट आता लपून राहणार नसल्याचं दिसून येत आहे. संजय दत्तचं आयुष्य जसं वादग्रस्त राहिलं आहे, त्या प्रमाणेच लोकांना संजय दत्तविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण देखील आहे. या सिनेमात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली आहे, तर राजकुमार हिराणी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.