मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या बाळांचा बाबा

जुळ्या बाळांची शेअर केली गोड नावं 

Updated: Aug 1, 2021, 04:19 PM IST
मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या बाळांचा बाबा

मुंबई : मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बाबा झाला आहे. संकर्षणच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. 27 जून रोजी या दोन्ही बाळांचा जन्म झाला आहे. संकर्षणने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. महत्वाचं म्हणजे या दोघांची नावं देखील त्याने शेअर केली आहे. 

दोन चिमुकल्यांसोबतचे संकर्षणने फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. काही तासांपूर्वीच संकर्षणने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोत दोन्ही बाळांचा चेहरा दिसत नाही पण त्यांची नाव अतिशय गोड आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

संकर्षणने मुलाचं नाव 'सर्वज्ञ' आणि 'स्रग्वी' असं मुलीचं नाव ठेवलं आहे. या दोन्ही नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेक कलाकारांनी संकर्षणला बाबा झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

संकर्षणची पोस्ट

चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे 

कु. स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे

(सर्वज्ञ : सर्व जाणनारा , ज्ञानी .. ;
स्रग्वी : पवित्रं तुळस..)

संकर्षणची पोस्ट अनेकांनी लाईक केली. संकर्षणची पत्नी शलाका पांडेने गोंडस बाळांना जन्म दिला आहे. 27 जून रोजी शलाकाने दोन बाळांना जन्म दिला. 1 ऑगस्टला संकर्षणने ही गोड बातमी शेअर केली आहे.