Kedarnath Teaser : पहिल्यांदा मुलीला मोठ्या पडद्यावर बघून भावूक झाली अमृता सिंह

पाहा टीझर 

Kedarnath Teaser : पहिल्यांदा मुलीला मोठ्या पडद्यावर बघून भावूक झाली अमृता सिंह

मुंबई : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या मुलीचा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सारा अली खान केदारनाथ या सिनेमातून डेब्यू करत आहे. 1 मिनिटं 40 सेकंदाचा हा केदरानाथ सिनेमाचा टिझर आहे. 

केदारनाथ हा सिनेमा 7 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. या सिनेमाच्या टीझरलला सोशल मीडियावर खूप चांगली पसंती मिळत आहे. आपल्या मुलीला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर बघून अभिनेत्री अमृता सिंह हिची प्रतिक्रिया जाणून घेण गरजेचं आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलीचं कौतुक हे असतंच... पाहा या सिनेमाचा टीझर 

एका मुलाखतीत अमृता सिंहने सांगितलं होतं की, मला केदारनाथ या सिनेमाच्या टीझर पाहण्याची आतुरतेने इच्छा होती. मला साराचं काम खूप आवडलं. माझी परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की तिला सर्व यश मिळो. आणि आशा आहे सारा खूप मेहनत करेल.

दिग्दर्शक अभिषेक कपूरचा केदारनाथ या सिनेमाची रोनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर दोघं निर्मिती करत आहे. या सिनेमाचं शुटिंग उत्तराखंडमध्ये झालं आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांमध्ये वाद झाले होते ज्यामुळे सिनेमाचं शुटिंग थांबल होतं. यानंतर दोघेही आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करू लागले. सारा अली खान करण जोहर आणि रोहित शेट्टीच्या सिंबा या सिनेमात रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.