ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सारा अली खानचं बोल्ड फोटोशूट, हॉट फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

बॉलीवूड म्हंटलं की फॅशन, ग्लॅमर, झगमगती दूनिया डोळ्यासमोर उभी राहते.

Updated: Feb 13, 2022, 04:59 PM IST
ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सारा अली खानचं बोल्ड फोटोशूट, हॉट फोटोंची सोशल मीडियावर चर्चा title=

मुंबई : बॉलीवूड म्हंटलं की फॅशन, ग्लॅमर, झगमगती दूनिया डोळ्यासमोर उभी राहते. बॉलीवूडच्या हिरो हिरोईन्सची फॅशन नेहमीच चर्चेत असते,  फॅशनसेन्सच्या बाबतीत सारा अली खान कोणत्याही अभिनेत्रीच्या मागे नाही.  ट्रांन्सपरंट ड्रेसमध्यल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या साराने  कॅमेऱ्यासमोर अतिशय किलर पोज दिल्या आहेत. तीचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.  

सैफ अली खानची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, सारा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते.  ती अनेकदा तिच्या नव्या लूकमूळे चाहत्यांना घायाळ  करते. आता तिने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

ब्लॅक ट्रांन्सपरंट ड्रेसमध्ये साराचा जबरदस्त लूक
फोटोंमध्ये सारा अली खान काळ्या रंगाच्या ट्रांन्सपरंट ड्रेसमध्ये पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर आणि हॉट दिसत आहे.  हेवेसोबत उडणारे केस तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत. साराने अभिनयाच्या जोरावर अगदी कमी वेळात करोडो चाहते कमावलेत.  मात्र सोशल मीडियावर सतत अपडेट राहील्याने तीच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झालीये.  तीच्या ह्या हॉट फोटोंना खूप पसंती मिळत आहे.  तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या घराबाहेर लोकं गर्दी करत असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा अली खानचे चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खान शेवटची 'अतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमार आणि धनुषसोबत काम केलं होतं. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात साराने उत्तम काम केलं आहे. सारा सेटवर तीच्या प्रेमळ स्वभावाने आणी हटके अंदाजाने सगळ्यांची मन जिंकते, त्यामुळे ऑफ कॅमेरासुद्धा तिच्या चाहत्यांमध्ये कमी नाही.