''शूsss ओरडू नका'' सारा अली खानचा संताप झाला अनावर! चित्रपट हीट झाल्यानंतर बदलला attitude?

Sara Ali Khan Viral Video: सारा अली खान आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होताना दिसते. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या लेटेस्ट व्हिडीओची. सध्या तिच्या या व्हिडीओनं सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 13, 2023, 06:02 PM IST
''शूsss ओरडू नका'' सारा अली खानचा संताप झाला अनावर! चित्रपट हीट झाल्यानंतर बदलला attitude?  title=
July 13, 2023 | sara ali khan shouts at paparazzi fans reacts video viral (Photo: Instant bollywood | Instagram)

Sara Ali Khan News: सारा अली खान आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. त्यामुळे तिची सर्वत्रच होताना दिसते. अनेकदा तिचे व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात सारा अली खानचा एटिट्यूड पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तिच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे सर्वच जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत. सोबतच सध्या तिच्या या एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ती जोरजोरात ओरडताना दिसत आहे. पण ती कोणावर ओरडते आहे? तुम्हाला माहिती आहे का? नक्की हा प्रकार आहे तरी काय? यावर नानाविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. सारा अली खान यावेळी हात जोडून कोणाला विनंती करत आहे आपण पाहुया. 

यावेळी ती एका रेस्टोरंटमध्ये दिसते आहे. रेस्टोरंटच्या बाहेर आल्यानंतर ती अचानकच कोणाला तरी हात जोडून विनंती करताना दिसते आहे. परंतु नक्की हा प्रकार आहे तरी काय यावर अनेकांच्या मनात संम्रभ सुरू झाले आहेत. ती रेस्टोरंटमधून बाहेर येते आणि तेवढ्यात साराचे नाव घेत पापाराझी ओरडू लागतात. ती पोझ द्यायला येते परंतु ती आत हॉटेलमध्ये जाणार तोच फोटोग्राफर्स पुन्हा ओरडू लागतात. हे पाहून सारा गोंधळते आणि त्यांच्याकडे पाहून ओरडू नका, रेस्टोरंटमधले लोकं पाहत आहेत. अशी हात जोडून विनंती करताना दिसत आहे. शूsss असंही म्हणताना दिसत आहे. 

हेही वाचा - ''पेंग्विनची गरज काय?'' शशांक केतकरनं पोस्ट केलेला बस स्टॉपवरील 'तो' फोटो का होतोय व्हायरल...

काही दिवसांपुर्वी तिचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती. तिचा हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच व्हायर होताना दिसतो आहे. त्यामुळे यया चित्रपटाचीही जोरात चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. त्यातून या चित्रपटातून विकी कौशल आणि सारा अली खान हे दोघंही पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यावेळी त्यांच्या केमेस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता साराच्या पुढील चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा अली खान हिची डेटिंगचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सोबतच यावेळी तिनं साधा आऊटफिट परिधान केला होता.