लग्नाच्या चर्चांवर विकी आणि कतरिना गप्प, साराची पहिली प्रतिक्रिया

कतरिना आणि विकीचं लग्न...

Updated: Nov 11, 2021, 03:07 PM IST
लग्नाच्या चर्चांवर विकी आणि कतरिना गप्प, साराची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाबद्दल चर्चा रंगत आहेत. पण अद्याप कतरिना आणि विकीने लग्नाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. लग्नांच्या चर्चांवर दोघांनी मौन बाळगलं आहे. अशात बुधवारी विकीला फोटोग्राफर्सने घेरलं आणि लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. तेव्हा विकीच्या चेहऱ्याव असलेले भाव कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सध्या विकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

बुधवारी विकी आणि अभिनेत्री सारा अली खानला एकत्र स्पॉट करण्यात आलं. यावेळी फोटोग्राफर्सने विकीला 'भाई शादी कब है?' असा प्रश्न विचारला. तेव्हा विकीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. पण तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असलेल्या साराच्या चेहऱ्यावरील हाव भाव चर्चेचा विषय ठरत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओमध्ये सारा अली खान विक्की कौशलकडे पाहाते. साराचं हसू काही थांबताना दिसत नाही. तिचा हा आनंदी चेहरा पाहून स्पष्टपणे कळते की, लग्न कधी आणि कुठे आहे, याविषयी साराला संपूर्ण माहिती आहे. सध्या सारा आणि विकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

एका रिपोर्टनुसार, दोघांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. दोघांचे वेडिंग आउटफिट्स डिजायनर सब्यसाचीने डिझाइन केले आहेत. यापूर्वी सब्यसाचीने दीपिका पदुकोणच्या लग्नाचा ड्रेसही डिझाइन केला होता. या वर्षी डिसेंबर महिन्याच्या आठवड्यात दोघं लग्न करू शकतात.