ड्रग्ज प्रकरणात सारा, श्रद्धा कपूर आणि दीपिकाची शनिवारी होणार चौकशी

बॉलिवूडच्या ३ मोठ्या अभिनेत्रींची होणार चौकशी

Updated: Sep 24, 2020, 07:59 PM IST
ड्रग्ज प्रकरणात सारा, श्रद्धा कपूर आणि दीपिकाची शनिवारी होणार चौकशी

मुंबई : अंमली पदार्थांचे सेवन विक्री आणि बाळगणे याबाबत एनसीबीकडून अभिनेत्रींची चौकशी होणार आहे. या प्रकरणात दीपिका पदुकोणची शनिवारी चौकशी होणार आहे. तर रुकूल प्रीत सिंग आणि करिष्मा प्रकाशची उद्या चौकशी होणार आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर चौकशी सुरु केल्यानंतर काही बॉलिवूड अभिनेत्रींचं नाव पुढे आलं होतं. ज्यामध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ला समन्स पाठवण्यात आला आहे. दीपिका ही सध्या गोव्यात होती. लवकरच ती मुंबईत येणार आहे.

एनसीबीच्या चौकशीदरम्यान अभिनेत्री आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यातील २०१७ दरम्यानचं व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं होतं. ज्यामध्ये अमंली पदार्थाबाबत चॅट होत असल्याचं म्हटलं जात आहे.

दीपिका पादुकोण शुक्रवार एनसीबी समोर हजर होईल अशी माहिती पुढे येत होती. पण आता ती शनिवारी चौकशीसाठी येणार असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. दुसरीकडे अभिनेत्री सारा अली खानला देखील एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. ती देखील सध्या गोव्यात होती आणि गुरुवारी मुंबईत दाखल झाली आहे. सारा आणि श्रद्धा कपूर यांना देखील शनिवारी एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी यायचं आहे.