मुंबई : माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. सारा तेंडुलकर अनेकदा तिचे फोटो पोस्ट करत असते, जे व्हायरल होतात. साराने पुन्हा तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, जे ट्रेंडमध्ये आहेत.
शनिवारी सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. फोटो शेअर करताना सारा तेंडुलकरने लिहिले की, ती राजकुमारीसारखी वाटत आहे. साराने हे डिझायनर गोपी वैदसाठी लिहिले आहे..
सारा तेंडुलकरने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्वतःचे तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे.
24 वर्षीय सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत अपडेट असते आणि चर्चेत असते. साराने नुकताच एका जाहिरातीचा व्हिडिओही शेअर केला आहे.
सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. मात्र त्यांच्या बाजूने दुजोरा मिळत नसून अफवांचा बाजार मात्र तापला आहे.
सारा तेंडुलकरही अलीकडेच आयपीएल 2022 मध्ये दिसली होती. जेव्हा ती आई अंजली तेंडुलकरसोबत मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचली होती.