अभिनय सोडून 'हा' अभिनेता आपल्या गावी करतो शेती...

टीव्हीचा लोकप्रिय शो 'साराभाई वर्सेस साराभाई' यामध्ये दिसणारा राजेश शर्माने अभिनय क्षेत्राला राम राम केल्याचा दिसत आहे. आणि आता त्याने बिहारच्या गावांत स्मार्ट शेती केली आहे. आता राजेशने एका गावाला स्मार्ट गाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अभिनय सोडून 'हा' अभिनेता आपल्या गावी करतो शेती... title=

मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय शो 'साराभाई वर्सेस साराभाई' यामध्ये दिसणारा राजेश शर्माने अभिनय क्षेत्राला राम राम केल्याचा दिसत आहे. आणि आता त्याने बिहारच्या गावांत स्मार्ट शेती केली आहे. आता राजेशने एका गावाला स्मार्ट गाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

साराभाईमध्ये राजेश रोसेशची भूमिका करताना हा अभिनेता दिसला आहे. मात्र आता त्याने अभिनय हे क्षेत्र सोडून बिहार येथील बर्मा गावांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांत राहून स्मार्ट शेती करण्याचा याचा निर्णय आहे. यावेळी त्याने शेतीची माहिती देण्याबरोबरच कोणताही खर्च न करता आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गावाचा रुप पालटणार 

हिंदी वेबसाईट भास्कर डॉट  कॉम मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पटनामध्ये राजेशचा जन्म झाला. एके दिवशी असंच झाडाखाली बसून राहिलेला असताना त्याला असं वाटलं की गावाची परिस्थिती बदलण्यासाठी काही तरी करायला हवं.  त्यानंतर राजेशने बर्मा या आपल्या गावी जायचा निर्णय घेतला. जेव्हा तो गावी पोहोचला तेव्हा तिथे पाणी आणि वीज देखील नव्हती. त्यानंतर त्याने गावकऱ्यांना वीज आणि पाणी आणण्यासाठी मदत केली. आता हळूहळू या गावाची परिस्थिती बदलत आहे.