अखेर रात्री 2 वाजता सलमान खानचा 'बॅकफ्लिप'चा प्रयत्न ठरला यशस्वी

अभिनेता सलमान खानच्या चित्रपटामध्ये किमान एक  सीन हा जाणीवपूर्वक शर्टलेस लूकमध्ये असतो. अनेक तरूणांना बॉडी ट्रान्सफर्मेशन करण्यासाठी सलमान खान प्रेरणा देतो.  वयाची पन्नाशी पार केलेला सलमान खान आजही जीमध्ये घाम गाळतो.   

Updated: Apr 16, 2018, 02:16 PM IST
अखेर रात्री 2 वाजता सलमान खानचा 'बॅकफ्लिप'चा प्रयत्न ठरला यशस्वी  title=

 मुंबई : अभिनेता सलमान खानच्या चित्रपटामध्ये किमान एक  सीन हा जाणीवपूर्वक शर्टलेस लूकमध्ये असतो. अनेक तरूणांना बॉडी ट्रान्सफर्मेशन करण्यासाठी सलमान खान प्रेरणा देतो.  वयाची पन्नाशी पार केलेला सलमान खान आजही जीमध्ये घाम गाळतो.   

 अली अब्बास जफरचं खास ट्विट  

 अली अब्बास जफरसोबत सलमान खानने सुल्तान आणि टायगर जिंदा है हे दोन सुपरहीट सिनेमे दिले आहेत. 'सुल्तान' चित्रपटामध्ये सलमान खानने पेहलवानाची भूमिका साकारली आहे. याकरिता सलमान खानने खूप मेहनत घेतली. त्यापैकीचा एक खास क्षण आता अली अब्बास जफरने ट्विट केला आहे.  

यशस्वी बॅकफ्लिप  

सुलतान चित्रपटामध्ये सलमान खानने वजन वाढवून पुन्हा घटवले. मात्र दरम्यान 'बॅकफ्लिप' मारण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत अलीच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अलीने केलेल्या ट्विटनुसार, पहाटे 2 वाजता सलमानचा बॅकफ्लिप मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. 

सलमान, अली बॉक्सऑफिसवर हॅट्रिक करण्याच्या तयारीत  

सलमान खान आणि अली अब्बास जफर या जोडीने बॉक्सऑफिसवर सलग दोन चित्रपटांद्वारा 300 कोटींचा पल्ला पार केला. आता अली अब्बास जफर आता भारत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सलमान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.  लवकरच या चित्रपटाबाबतचेही अपडेट्स मिळतील.. असे त्याने ट्विट केले आहे. 

 

2019 च्या ईदला सलमान  खान चाहत्यांसाठी 'भारत' हा सिनेमा घेऊन घेणार आहे. त्यापूर्वी सलमान खानचा 'रेस 3' आणि टेलिव्हिजनवर 'दस का दम' पाहता येणार आहे.