Satish Kaushik Death : बॉलिवूड विश्वातून धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहितं ही माहिती दिली आहे. राम लखनमध्ये अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची जोडी हिट होती.
सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे जवळचे मित्र होते. सतीश कौशिकसोबतचा एक फोटो शेअर करत अनुपम खेर म्हणाले की, मला माहित आहे “मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे! पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल हे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते . 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम!! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही! ओम शांती!
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सतीश कौशिक यांनी सर्वांसोबत होळी खेळली होती. सिने कलाकार आणि चित्रपसृष्टीतील इतर लोकांसोबत खेळलेल्या या होळीचे सर्व फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्टही केले होते. अशात अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे.
Colourful Happy Fun #Holi party at Janki Kutir Juhu by @Javedakhtarjadu @babaazmi @AzmiShabana @tanviazmi.. met the newly wed beautiful couple @alifazal9 @RichaChadha.. wishing Happy Holi to everyone #friendship #festival #Holi2023 #colors pic.twitter.com/pa6MqUKdku
— satish kaushik (@satishkaushik2) March 7, 2023
'साजन चले ससुराल' या चित्रपटात सतीश कौशिक यांनी मठ स्वामीची भूमिका साकारली होती. त्यांचा दक्षिण भारतीय शैलीने प्रेक्षकांना खूप हसवले. या चित्रपटात कौशिक गोविंदाच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते.
1997 मध्ये आलेल्या 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी' चित्रपटात सतीश कौशिक यांनी अक्षय कुमारच्या मामाची भूमिका साकारली होती.
डेव्हिड धवनच्या 'हसीना मान जायेगी' या कॉमेडी चित्रपटात सतीश कौशिकने कादर खानच्या पर्सनल असिस्टंटची भूमिका साकारली होती.
1987 मध्ये रिलीज झालेल्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटात सतीश कौशिक यांनी कॅलेंडर नावाच्या कुकची भूमिका केली होती.
कौशिकने डेव्हिड धवनच्या कॉमेडी चित्रपट 'क्यूंकी मैं झुठ नहीं बोलता'मध्ये गोविंदाच्या मित्र मोहनची भूमिका केली होती.