मंदिरा आणि राज यांचा भव्य व्हिला आता मिळणार भाडेतत्वावर; एवढं असेल भाडं

राज कौशल यांच्या निधनामुळे बेदी आणि कौशल कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

Updated: Jul 3, 2021, 09:40 AM IST
मंदिरा आणि राज यांचा भव्य व्हिला आता मिळणार भाडेतत्वावर; एवढं असेल भाडं title=

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं बुधवारी  सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बेदी आणि कौशल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ह्रदय विकाराच्या धक्क्याने राज कौशल यांचं निधन झालं आहे. ते फक्त 49 वर्षांचे होते. अशात मंदिरा आणि राज कौशल यांच्याबद्दल अनेक गोष्टीसमोर येत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरा आणि राज यांनी मुंबईपासून थोड्याचं अंतरावर मड बेटावर एक भव्य बंगला विकत घेतला होता. आता मंदिराने तो बंगला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मड आइलैंड पर मंदिरा और राज ने खरीदा था आलीशान विला, अब मिल रहा है रेंट पर...देना होगा इतना किराया

तुम्हाला देखील या भव्य बंगल्यात राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या या भव्य बंगल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मंदिरा आणि राज यांचा हा भव्य बंगला सी फेसिंग आहे. त्यामुळे फोटोंमध्ये घरातील सी व्ह्यू अतिशय  सुंदर दिसत आहे. 

या बंगल्यामध्ये एक स्विमिंगपूल, 4 बेडरूम आणि 5 बाथरूम आहेत. या घरात एक दिवस राहाण्याचं भाडं 42 हजार रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार  हा भव्य बंगला मंदिरा आणि तिच्या आईने मिळून खरेदी केला होता. या बंगल्यामध्ये अनेक चित्रपटांचं चित्रीकरण देखील करण्यात आलं आहे.