बॉलिवूड अभिनेत्रीची 'ही' अवस्था पाहून अंगावर येईल काटा!

यापूर्वी कोणत्याही सेलिब्रिटी परीक्षकाने असे काही केले असेल. "मी घाबरलो का? अर्थात, घाबरलो!"

Updated: Jul 3, 2021, 07:34 AM IST
बॉलिवूड अभिनेत्रीची 'ही' अवस्था पाहून अंगावर येईल काटा!

मुंबई :सर्वसामान्यपणे रियालिटी शोजच्या परीक्षकांची एक सौम्य बाजू आपल्याला नेहमी बघायला मिळते. पण सुपर डान्सरमध्ये शिल्पा शेट्टीची एक अगदीच वेगळी आणि अनपेक्षित अशी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनुराग बासूने त्याला ‘बदले की आग’ म्हटले!

कोरिओग्राफर वैभव घुगे याने या आणि मागच्या काही सत्रांमध्ये शिल्पाला लक्ष्य बनवून सतत घाबरवले, सतावले. त्यामुळे आता वेळ आली होती, शिल्पाने त्याची 'सव्याज परतफेड' करण्याची आणि वैभवची चाल त्याच्यावरच उलटवण्याची! अलीकडेच 'सुपर डान्सर 4' चे शूटिंग सुरू असताना शिल्पाला एक नामी संधी मिळाली. तिने असा काही सापळा रचला की, त्यात अडकलेल्या वैभव सह सर्व सुपर गुरूंनी तिला ‘साष्टांग दंडवत’ घातले.

 

शिल्पा म्हणाली, "सुपर डान्सरच्या सगळ्या सत्रांमध्ये, प्रत्येक वेळी वैभवने मला चकवले, घाबरवले की मी मनोमन याची परतफेड करण्याचे ठरवत असे. आम्ही दमणमध्ये या शो चे शूटिंग करत होतो, त्यामुळे मला पलटवार करण्याची नामी संधी मिळाली. मी अशा तयारीने निघाले, की दमणला एक दिवस आधी पोहोचता येईल. माझ्या टीमने माझ्या मेकअपचा खूप बारकाईने विचार केला होता, आणि मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा तो मेकअप पाहून स्वतः मी देखील दचकले होते!"

ती पुढे म्हणाली, "मी हे यापूर्वीही सांगितले आहे की, सुपर डान्सरचा संपूर्ण क्रू माझ्या कुटुंबासारखा आहे. त्यामुळे, अशा वेळी मला खूप मजा येते."

संपूर्ण मेकअप करण्यासाठी शिल्पाला जवळजवळ 3 तास लागले. हॉटेलच्या मुख्य दारापाशी ती लपून बसली आणि दारातून आत येणार्‍या सगळ्या कोरिओग्राफर्सना तिने त्यांच्यावर झडप घालून घाबरवले. वैभवला शेवटी त्याच्या तोडीचा सव्वाशेर भेटला!

 

वैभव म्हणाला, "सुपर डान्सरशी निगडीत असलेल्या माझ्यासहित सगळ्यांसाठी शिल्पा मॅम एक प्रेरणा आहेत. मी त्यांना इतक्या वेळा घाबरवले आणि त्यांच्या खोड्या काढल्या, पण त्यांनी यावेळी आम्हाला जे घाबरवले तो प्रकार त्या सगळ्यावर कुरघोडी करणारा होता.

एक दिवस आधी येऊन, कित्येक तास चिकाटीने बसून मेक करून आमच्यासाठी त्यांचे हे करणे आम्हाला विशेष असल्याची जाणीव देणारे आहे. मला नाही वाटत की, यापूर्वी कोणत्याही सेलिब्रिटी परीक्षकाने असे काही केले असेल."मी घाबरलो का? अर्थात, घाबरलो!"

याला पुस्ती जोडत फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनीचे निर्माते रणजीत ठाकूर म्हणाले, "असे पहिल्यांदाच झाले आहे की एका परीक्षकाने इतके परिश्रम घेऊन असे काही केले, गेल्या 4 सीजनचा सूड उगवला. आणि शिल्पाने स्वतःच पद्धतशीरपणे हा सापळा रचला. आणि त्यासाठी 4 तासांपेक्षा जास्त वेळ देऊन अपेक्षित तो मेकअप करून घेतला. सुपर डान्सरच्या इतिहासातील हा एक संस्मरणीय किस्सा असेल. बघायला विसरू नका.”