मुंबई : बेगुसराई मालिकेत शिवांगी जोशीच्या वडिलांची भूमिका करणारे राजेश करीर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मदत मागितली होती. त्यानंतर त्यांनी अनेकांनी भरघोस मदत केल्यानंतर त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत आणि आता पैसे पाठवू नका असे ही सांगितले आहे. राजेश यांनी सांगितलं की, त्यांनी मदत मागितल्यानंतर अनेकांनी त्यांच्या खात्यात पैसे पाठवले. ते आता खूप आहेत.
फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांना अनेकांनी मदत पाठवली. आभार मानताना ते भावूक झाले होते. आता माझ्या खात्यात पैसे टाकू नका असं ते सांगत होते. त्यांनी म्हटलं की, 'कृपया आता अकाउंटमध्ये पैसे टाकू नका. मला वाटत की माझ्या ऐपतीपेक्षा तुम्ही अधिक मदत केली आहे.' अशी चर्चा आहे की, शिवांगी जोशीने देखील त्यांना १० हजारांची मदत केली आहे. पण अजून त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
राजेश करीर मागील ३ महिन्यांपासून बेरोजगार आहेत. काम आणि पैसे नसल्याने त्यांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली. त्यांनी म्हटलं की, 'मित्रांनो मी कोणत्याच परिस्थितीत आयुष्यात पराभव नाही स्वीकारू शकत. फक्त एकच पर्याय आहे माझ्याकडे मला मदत करा. बँक डिटेल्स आणि फोन नंबर शेअर करत आहे. कोणी ३०० रुपये दिले तर मी माझ्या गावी पंजाबला जावू शकेल.'
राजेश करीर हे मुळचे पंजाबचे आहेत. मागील 15-16 वर्षापासून ते मुंबईत राहत आहेत. मागील काही दिवसांपासून काम नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले.