सेक्स रॅकेटचं बॉलिवूड कनेक्शन

मुंबई पोलिसांची मंगळवारची कारवाई 

Updated: Jan 22, 2020, 07:56 AM IST
सेक्स रॅकेटचं बॉलिवूड कनेक्शन

मुंबई : मुंबई पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांनी तीन सेक्स रॅकेटला जगासमोर आणलं आहे. या सेक्स रॅकेटचा थेट संबंध बॉलिवूडशी जोडला गेलेला आहे. मंगळवारी पोलिसांनी हे सेक्स रॅकेट पकडलं आहे. 

पोलिसांनी पकडलेल्यांपैकी एक प्रोडक्शन मॅनेजर आणि कास्टिंग डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे. या दोघांवर दोन विदेशी विद्यार्थ्यांसह तीन महिलांना देह व्यापारा ठकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेची महिन्याभरातील ही चौथी कारवाई आहे. 

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरीमधील इंपीरियल पॅलेस हॉटेलमध्ये छापा मारण्यात आला. यामध्ये प्रोडक्शन मॅनेजर नवीनद शरीफ, अहमद अख्तर आणि कास्टिंग दिग्दर्शक नवीद सादिक सयाद यांना अटक करण्यात आलं आहे. तर तेथून तीन महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन परदेशी विद्यार्थी तुर्कमेनिस्तानचे असून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आले होते. सिनेमांत काम करण्याची इच्छा असल्यामुळे मुंबईत आले होते. या दरम्यान त्यांची ओळख अख्तर आणि सयाद यांच्याशी झाली. या दोघांनी विद्यार्थ्यांवर ही तडजोड करण्यास दबाव टाकला. यानंतर त्यांना देह व्यापार करण्यामध्ये ढकलण्यात आलं. 

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या सेक्स रॅकेटचा तपास घेत आहेत. यामध्ये अडकलेल्या तीन महिलांना बाहेर काढण्यात आलं आहे. यामधील एका महिलेने सावधान इंडियामध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. तर इतर दुसऱ्या महिलेने वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. तर तिसऱ्या महिलेने मराठी सिनेमांत काम केलं आहे.